Shan Masood  saam tv
Sports

Shan Masood : पाकिस्तान टीमच्या ड्रेसिंग रूमध्ये राडा; बाबर आझमवर संतापला शान मसूद?

Pakistan vs Bangladesh: पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना सुरु असून कर्णधार शान मसूद चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ ड्रेसिंग रूममधला असून शान मसूद बाबर आझमवर वैतागलेला दिसून येतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सध्या २ सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. रावळपिंडीमध्ये सुरु असलेला हा सामना रोमांचक झाला आहे. दरम्यान या सामन्यात पुन्हा एकदा शान मसूद चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ ड्रेसिंग रूममधला असून शान मसूद बाबर आझमवर वैतागलेला दिसून येतोय.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील टेस्ट सिरीजमधील पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जातोय. पाकिस्तानने पहिला डाव 448 रन्सवर घोषित केला होता. दुसरीकडे प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 565 रन्स केले. या सामन्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. माजी कर्णधार बाबर आझमवर कॅप्टन शान मसूद नाराज झाल्याचा दावा केला जातोय. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये शान समूद संतापलेला असल्याचं दिसून येतंय. यावेळी तो ड्रेसिंग रूमधील स्टाफला काहीतरी सांगताना दिसतोय. यावेळी तो रागाच्या भरात मैदानाकडे इशारा करतो.

दरम्यान शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलंय की, शान मसूद बाबरने कॅच सोडल्यामुळे रागात आहे. याशिवाय बाब आझमने केलेली फलंदाजी पाहता त्याच्या प्रदर्शनावरूनही मसूद संतापला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट होताच व्हायरल झाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सर्व आलबेल?

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये काहीतरी बिनसलं आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या टीमचे दोन गट पडले असून यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होतोय.

शान मसूदचा धक्कादायक निर्णय

पाकिस्तान टीममधील फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) डबल सेंच्युरीच्या जवळ होता. त्याला डबल शतक पूर्ण करण्यासाठी त्याला अवघ्या २९ रन्सची आवश्यकता होती. पुढच्या दोन-तीन ओव्हरमध्ये त्याने मोठे फटके खेळून त्याने डबल सेंच्युरी पूर्ण केली असती. मात्र पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने डाव घोषित केल्याने रिझवानचं दुहेरी शतक हुकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT