वेस्ट इंडीजच्या 'या' दिग्गजाचा आजचा शेवटचा सामना; IPL खेळत राहणार Saam TV
Sports

वेस्ट इंडीजच्या 'या' दिग्गजाचा आजचा शेवटचा सामना; IPL खेळत राहणार

कारण वेस्ट इंडीज क्रिक्रेटला ज्या खेळाडूने चार चांद लावणारा त्या खेळाडूचा शेवटचा सामना असणार आहे.

वृत्तसंस्था

आज ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज (AUS vs WI) यांच्यात सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकूण सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करायची आहे तर वेस्ट इंडीजला आपल्या स्पर्धेचा शेवट गोड करायचा आहे. परंतु आजचा सामना क्रिक्रेट चाहत्यांसाठी कभी खुशी कभी गम वाला असणार आहे. कारण वेस्ट इंडीज क्रिक्रेटला ज्या खेळाडूने चार चांद लावणारा त्या ड्वेन ब्रावो याचा आजचा शेवटचा सामना असणार आहे. ड्वेन ब्रावो गेली अनेक वर्ष वेस्ट इंडीजकडून खेळत आहे.

ब्रावोने आपल्या संपुर्ण कारकिर्दीत ४० कसोटी, १६४ एकदिवसीय सामने, ९१ टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. ब्रावोने ४० कसोटी सामन्यात २२०० धावा केल्या आहेत तर ८६ बळी घेतले आहेत. १६४ एकदिवसीय सामन्यामध्ये २९६८ धावा केल्या आहेत तर १९९ बळी घेतले आहेत. ब्रावोकडे एक उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जाते. आंतराष्ट्रीय क्रिक्रेटमधून आज ब्रावो जरी निवृत्ती घेत असला तरी तो इतर स्पर्धात्मक लीग खेळत राहणार आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नईमध्ये सुपर किंग्स कडून खेळत आहे.

दरम्यान बांगलादेशला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची मोहीम पुन्हा रुळावर आली आहे आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी शनिवारी येथे होणाऱ्या सुपर-12 लेगच्या अंतिम सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धला पराभूत करावा लागेल. गेल्या शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने गुरुवारी बांगलादेशवर विक्रमी आठ गडी राखून पुनरागमन केले आणि त्यांचा निव्वळ धावगती -0.627 वरून +1.031 वर नेला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT