Team india Saam Tv
Sports

IND VS AUS 3rd Test: फिरकीनेच केला टीम इंडियाचा घात ! भारताचा पहिला डाव १०९ धावांवर संपुष्टात

भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 3rd test 1st inning: भारत विरुध्द ऑस्टेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला आहे. कारण भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला आहे. (Latest Sports updates)

भारतीय संघातील फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांचा तोड शोधून काढता आला नाहीये. या सामन्यात केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. मात्र त्याला या संधीचा लाभ घेता आला नाहीये. तो अवघ्या २१ धावा करत माघारी परतला. तर रोहित शर्मा १२, विराट कोहली २२, चेतेश्वर पुजारा १, रवींद्र जडेजा ४, श्रेयस अय्यर ० आणि केएस भरत अवघ्या १७ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अक्षर पटेलने १२, आर अश्विनला ३ तर उमेश यादवने १७ धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज ठरले वरचढ..

ऑस्ट्रेलिया संघातील फिरकी गोलंदाजांनी या डावात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघाकडून कुन्हेमनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर नाथन लायनेने ३ आणि टॉड मर्फीला १ गडी बाद करण्यात यश आले आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत :

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया :

उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT