Team india  Saam tv
Sports

Ind vs Aus 3rd test: अवघ्या अर्ध्या तासात ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास ! पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कमबॅक केले आहे

Ankush Dhavre

Ind vs Aus 3rd test 1st inning: अवघ्या अर्ध्या तासात ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास ! पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. इंदूरच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या दिवशी हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कमबॅक केले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्ठात आला आहे. (Latest sports updates)

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय संघाला या डावात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या डावात भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला होता.

ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या दिवशी चांगली सुरुवात मिळाली होती. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसअखेर ४ गडी बाद १५६ धावा केल्या होत्या.

पहिल्या दिवशी आघाडीवर असलेला ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. मात्र उमेश यादव आणि आर अश्विनने भारतीय संघाला जोरदार कमबॅक करून दिले. दुसऱ्या दिवशी पीटर हॅंड्सकॉम्ब बाद होताच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधीक ४, उमेश यादवने ३ आणि आर अश्विनने ३ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकलला लेट मार्क, प्रवाशांचा खोळंबा, पाहा व्हिडिओ

IAS Success Story: CA झाली, नंतर UPSC परीक्षेत मिळवली दुसरी रँक; वडिलांचे स्वप्न केले पूर्ण; IAS हर्षिता गोयल यांचा प्रवास

Maharashtra Rain Alert: दहीहंडीला पावसाची सलामी, मुंबई-रायगडला रेड अलर्ट, IMD चा अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Breaking : मुंबईत अतिमुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT