harshit rana twitter
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचं काय खरं नाय..पर्थ कसोटीत भारताचा हा खतरनाक गोलंदाज करणार पदार्पण

India vs Australia 1st Test, Harshit Rana: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार खेळाडू पदार्पण करु शकतो.

Ankush Dhavre

Harshit Rana, Border Gavaskar Trophy: बॉर्डर- गावसकर मालिका सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

मात्र पहिल्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान वेगवान गोलंदाजी आक्रमणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून कोणाला मिळणार संधी?

या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळणार, हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र तिसरा वेगवान गोलंदाज कोण असेल, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा हे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. या दोघांमधून हर्षित राणाला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण त्याने यापूर्वीही आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे.

मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. या मैदानावर गोलंदाजांना चांगली उसळी मिळते. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

हर्षित राणाला संधी मिळणार?

या सामन्यात रोहित शर्मा नसणार आहे. त्यामुळे उपकर्णधार रोहित शर्मा कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. बुमराहच्या जोडीला सिराज असेल. आता माध्यमातील वृत्तानुसार हर्षित राणा तिसरा वेगवान गोलंदाज असू शकतो. त्याला या कसोटी सामन्यातून पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दमदार कामगिरी

काही दिवसांपू्र्वी भारतीय अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये अनधिकृत कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत प्रसिद्ध कृष्णाच्या उसळी घेणाऱ्या चेंडूनी ऑस्ट्रेलियान फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने या मालिकेत गोलंदाजी करताना, १७.३० च्या सरासरीने १० गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT