ipl trophy saam tv news
Sports

IPL 2025 Schedule: या दिवशी जाहीर होणार IPL चे वेळापत्रक! फायनल कुठे होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

IPL 2025 Schedule Latest Update: आयपीएल २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धा जवळ आली आहे. काही महिन्यांपूर्वी या स्पर्धेसाठीचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावात युवा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला गेला. केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील क्रिकेट फॅन्स ही स्पर्धा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

ही स्पर्धा २१ मार्चपासून सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र स्पर्धेचं वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही. दरम्यान या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आणि फायनलचा सामना कुठे होणार? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृ्त्तानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा येत्या एका आठवड्यात केली जाऊ शकते. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता वेळापत्रक केव्हा जाहीर होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कुठे होणार फायनल?

माध्यमातील वृत्तानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो. तर स्पर्धेतील प्लेऑफचे दोन्ही सामने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जाऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरचा आणि फायनलचा सामना कोलकात्यात खेळवला जाऊ शकतो.

यासह स्पोर्ट्स तकच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपले २ सामने न्यूट्रल वेन्यूवर खेळणार आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला ५ सामने हे जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहेत. तर उर्वरीत २ सामन्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ २ सामने विशाखापट्टनममध्ये खेळताना दिसून येऊ शकतो. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वेळापत्रक समोर येताच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

SCROLL FOR NEXT