Rishabh Pant Fully Fit for IPL 2024 twitter
Sports

IPL 2024 New: मोठी बातमी! IPL खेळण्यासाठी Rishabh Pant ला BCCI कडून ग्रीन सिग्नल; हे २ प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

Rishabh Pant Return In IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी रिषभ पंतबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

BCCI Update On Rishabh Pant:

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धा तोंडावर असताना रिषभ पंत पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. तो क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.

रिषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ रोजी कार अपघात झाला होता. या दुखापतीमुळे १४ महिने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दुर राहावं लागलं होतं. आता त्याला आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी पूर्णपणे फिट घोषित करण्यात आलं आहे. आगामी हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसून येणार आहे. गतवर्षी रिषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.

हे दोन्ही गोलंदाज बाहेर..

एकीकडे रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघासाठी कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. बीसीसीआयने दिलेल्सा माहितीत म्हटले की, २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध कृष्णाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत रिहॅब करणार आहे. याच कारणामुले तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही.

तर दुसरीकडे मोहम्मद शमीच्या दुखापतीवर देखील शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला फिट होण्यासाठी आणखी काही महिने लागतील. आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT