mohammed shami twitter
Sports

Mohammed Shami: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार गोलंदाज बॉर्डर- गावसकर ट्रॉफीला मुकणार

Border- Gavaskar Trophy: येत्या नोव्हेंबर महिन्यात बॉर्डर- गावसकर ट्रॉफी होणार आहे. दरम्यान भारताच्या स्टार गोलंदाजाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami News In Marathi: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. शमी हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. येत्या काही महिन्यात भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या दौऱ्यावर महत्वाचा गोलंदाज असणार आहे. दरम्यान या दौऱ्यापूर्वी मोहम्मद शमीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, मोहम्मद शमी भारतीय संघात कमबॅक करू शकतो. त्यामुळे तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळणार असं म्हटलं जात होतं. खेळाडू फिट झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली फिटनेस सिद्ध करून भारतीय संघात कमबॅक करत असतात. येत्या ११ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या बंगालच्या संघात मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेलं नाही.

बंगालचा संघ येत्या ११ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. तर १८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात बिहारचा सामना करताना दिसून येणार आहे. मात्र शमीला बंगालच्या संघातून वगळण्यात आलं आहे. यादरम्यान १६ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शमी या मालिकेत देखील खेळताना दिसण्याची शक्यता खूप कमी आहे.

शमी बॉर्डर गावसकर ट्रॉफीला मुकणार?

मोहम्मद शमी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आपला शेवटचा वनडे सामना खेळताना दिसून आला होता. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज होता. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत तो भारतीय संघासाठी कमबॅक करू शकलेला नाही. शमीला जर न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळण्याची संधी मिळाली नाही, तर तो बॉर्डर गावसकर ट्रॉफीत कमबॅक करेल याची शक्यता खूप कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT