cheteshwar pujara twitter
Sports

Cricketer Retirement: भारत- इंग्लंड मालिका सुरु असताना स्टार फलंदाजाचा क्रिकेटला रामराम

Sheldon Jackson Announced Retirement: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने सुरु असताना, स्टार भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट फॅन्स २०२४ हे वर्ष कधीच विसरु शकणार नाहीत. कारण याच वर्षी भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. ही स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी-२० क्रिकेटला रामराम केला.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणखी काही दिग्गज खेळाडू होते, ज्यांनी किकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता रणजी ट्रॉफी सुरु असताना आणखी एका खेळाडूने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेल्डन जॅक्सनचा क्रिकेटला रामराम

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने पार पडले. ८ फेब्रुवारीपासून सौराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सौराष्ट्र संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

हा सौराष्ट्र संघाचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सनच्या रणजी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर शेल्डन जॅक्सन संघातील खेळाडूंसोबत फोटोशूट करताना दिसून आला.

शेवटच्या सामन्यात ठरला फ्लॉप

सौराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही संघांमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सौराष्ट्राला हवा तसा खेळ करता आला नाही. हा महत्वाचा सामना सौराष्ट्र संघाला ९८ धावांनी गमवावा लागला आहे.

पहिल्या डावात फलंदाजी करताना सौराष्ट्राचा डाव २१६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना गुजरातने पहिल्या डावात ५११ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. सौराष्ट्रकडून फलंदाजी करताना शेल्डन जॅक्सनन ४६ चेंडूत अवघ्या १४ धावांची खेळी केली. या शानदार विजयासह गुजरातने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

अशी राहिलीये कामगिरी

शेल्डन जॅक्सनने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. मात्र त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ३१ शतकं झळकावण्याची नोंद आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १०५ सामन्यांमध्ये २१ शतक झळकावली. ७२४२ धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ९ शतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने २७९२ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irfan Pathan : कुत्र्याचं मांस खाल्ल असल्याने...; विमानात इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीमध्ये राडा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

SCROLL FOR NEXT