ben stokes record  twitter
Sports

ENG vs NZ: बेन स्टोक्स काय खेळलाय! किवी गोलंदाजांची धुलाई करत मोडला मोठा रेकॉर्ड

Ben Stokes Record, ENG vs NZ: बेन स्टोक्सने या सामन्यात मोठा रेकॉर्ड केला आहे.

Ankush Dhavre

Ben Stokes Record In ODI:

इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ४ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा वनडे सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाहुण्या न्यूझीलंड संघाचा १८१ धावांनी धुव्वा उडवत विजय मिळवला आहे. यासह मालिकेत २-१ ची आघाडी घेतली आहे. दरम्यान १८२ धावांची विस्फोटक खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आह

इंग्लंडचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वीच वनडे निवृत्तीतुन माघार घेतली आहे. आगामी वर्ल्डकप स्पर्धा लक्षात ठेऊन त्याने हा निर्णय घेतला. आता न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याचा विस्फोटक अंदाज पाहायला मिळाला आहे.

या सामन्यात त्याने अवघ्या ७६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. मात्र त्याचे दुहेरी शतक अवघ्या १८ धावांनी हुकले आहे. यादरम्यान तो इंग्लंड संघासाठी वनडेत सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात डेव्हिड मलान बाद होऊन माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या डावात बेन स्टोक्सने १२४ चेंडूंचा सामना करत १८२ धावांची खेळी केली. यासह त्याने जेसन रॉयचा १८० धावांची खेळी करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ओव्हलच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली होती. इंग्लंडकडून फलंदाजी करताना डेव्हिड मलानने ९६ तर बेन स्टोक्सने १८२ धावांची खेळी केली.

तर कर्णधार जोस बटलर ३८ धावा करत माघारी परतला. इंग्लंडचा डाव ३६८ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून एकट्या ग्लेन फिलिप्सने ७२ धावांची खेळी केली. दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. न्यूझीलंडचा डाव १८७ धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT