Beed Crickter Sachin Dhas Profile Saamtv
Sports

Sachin Dhas : अंडर 19 वर्ल्डकपच्या सेमीफायनलला बीडचा सचिन चमकला; सामना जिंकल्यानंतर आई-वडिलांनी सांगितली मनातली इच्छा

Sachin Dhas mother father reaction : सेमीफायनलमधील विजयानंतर बीडमध्ये सचिनच्या कुटुंबात आनंदात उत्सव साजरा केला गेला आहे. या विजयानंतर सचिनने अंडर 19 वर्ल्डकप भारताला जिंकून द्यावा, अशी बोलकी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे.

Vishal Gangurde

Sachin Dhas News:

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल सामन्यात बीडचा भूमिपूत्र सचिन धस चांगलाच चमकला आहे. सचिनच्या खेळीच्या जोरावर युवा टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमधील विजयानंतर बीडमध्ये सचिनच्या कुटुंबात आनंदात उत्सव साजरा केला गेला आहे. या विजयानंतर सचिनने अंडर 19 वर्ल्डकप भारताला जिंकून द्यावा, अशी बोलकी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे. (Latest marathi News)

बीडच्या मातीतला मराठमोळा खेळाडू सचिन धसची सेमीफायनलमधील ९६ धावांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची ठरली. त्याचा जोडीदार कर्णधार उदयने ८१ धावा कुटल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांच्या १७१ धावांच्या खेळीने युवा टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. युवा टीम इंडियाच्या विजयानंतर बीडच्या सचिन धसच्या घरी जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. सचिनच्या मित्रमंडळींनी त्याच्या आई-वडिलांना पेढे भरवले.

सचिनचे आई-वडील काय म्हणाले?

बीड सारख्या ग्रामीण भागातून अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सचिन धसची निवड झाली आहे. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये सचिनने आतापर्यंत उत्तम खेळी केली आहे. त्यामुळे आता वर्ल्डकपच्या फायनलमध्येही त्याने चांगला खेळ खेळावा. अंडर 19 वर्ल्डकप भारताला जिंकून द्यावा आणि सचिन तसं करेल, असा विश्वास त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

सचिनची आई आहे पोलीस अधिकारी

दरम्यान, सचिन धसची आई ही महाराष्ट्र पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. तसेच त्या माजी कबड्डीपडू देखील आहेत. तसेच सचिनची बहीण ही पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: परळीतील लॉजवर पोलिसांचा छापा, २ महिला अन् पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Bridal Hairstyles : नवरीसाठी खास 'ब्राइडल हेअरस्टाईल्स'; लांब केसांमधील सौंदर्य खुलून येईल

Eye cancer symptoms: ही लक्षणं दिसू लागली तर समजा डोळ्यांच्या कॅन्सरची होतेय सुरुवात; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

Paithani Price: महिलांना झटका! पैठणीची किंमत वाढली; VIDEO

SCROLL FOR NEXT