IPL 2022 च्या लिलावापूर्वी BCCI चा मोठा निर्णय Twitter/ @IPL
Sports

IPL 2022 च्या लिलावापूर्वी BCCI चा मोठा निर्णय

आयपीएल 2021 हंगामाचा विजेता अद्याप मिळालेला नाही. कोरोनामुळे आयपीएल स्थगित झाले होते. आता त्याचा दुसरा टप्पा युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

आयपीएल 2021 (IPL 2021) हंगामाचा विजेता अद्याप मिळालेला नाही. कोरोनामुळे (Coronavirus) आयपीएल स्थगित झाली होती. आता त्याचा दुसरा टप्पा युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022 च्या हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. आयपीएलमधील 2022 (IPL 2022) चा हंगाम खूप मजेदार होणार आहे. या हंगामात आणखी दोन नवीन फ्रँचायझी भाग घेऊ शकतात.

एका माध्यामाच्या म्हणण्यानुसार 2022 च्या बोली पूर्वी प्रत्येक फ्रँचायझींना चार खेळाडू कायम ठेवता येतील. तथापि, अट अशी आहे की एक संघ तीन भारतीय खेळाडू आणि एक परदेशी खेळाडू किंवा दोन भारतीय खेळाडू आणि दोन परदेशी खेळाडूंना कायम ठेऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील तीन वर्षांत पगाराची रक्कम 85 कोटी रुपयांवरून 100 कोटी रुपयांवर आणणार आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंना जास्त पैसे मिळावे हे बीसीसीआयचे लक्ष्य आहे.

सूत्रांनी माध्यामांना सांगितले की, “काही खेळाडूंना कायम न राहण्याचा विचार येईल आणि लिलावात जाणे आवडेल. कारण पगाराची रक्कम वाढली आहे आणि दोन नवीन संघ जोडले जाणार आहेत. म्हणूनच, प्रतिभा वाढवण्यासाठी स्पर्धा होईल. काही नामांकित भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांची नावे लिलावासाठी ठेवावी अशी अपेक्षा आहे". आयपीएल 2008 च्या लिलावा दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक 6 कोटी रुपये कमाई करणारा खेळाडू ठरला होता. त्यानंतर त्याचा पगार अडीच पटीने वाढून 15 कोटी रुपये झाला आहे.

सर्वात महागडे भारतीय

खेळाडू 2008 2021

एम.एस. धोनी- 6 कोटी 15 कोटी

विराट कोहली- 12 लाख 17 कोटी

रोहित शर्मा- 3 कोटी 15 कोटी

सुरेश रैना- 2.6 कोटी 11 कोटी

दिनेश कार्तिक- 2.1 कोटी 7.4 कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT