viral video youtube
क्रीडा

Viral Video: 5 बॉलवर सलग 5 सिक्स! सहाव्या बॉलवर बॅट्समनने जे केलं ते... VIDEO पाहून कौतुकच कराल

Viral Cricket Video: सोशल मीडियावर एका फलंदाजाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही कौतुकच कराल.

Ankush Dhavre

सध्या भारताचा युवा स्टार फलंदाज प्रियांश आर्या तुफान चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे,पठ्ठ्याने थेट युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. आता युवराजचा रेकॉर्ड म्हटलं, तर सर्वांना स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात मारलेले ६ षटकार आठवतात.

असाच काहीसा कारनामा या फलंदाजाने दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत करुन दाखवला आहे. फिरकी गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करताना त्याने हा कारनामा करुन दाखवला आहे. दरम्यान प्रियांश आर्याची चर्चा सुरु असताना एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारणं मुळीच सोपं नसतं. त्यामुळे काही मोजकेच फलंदाज आहेत. ज्यांना हा कारनामा करता आला आहे. आता या यादीत प्रियांश आर्याचंही नाव जोडलं गेलं आहे. मात्र प्रियांश आर्याच्या सलग ६ षटकारांची चर्चा सुरु असताना, मराठमोळ्या दर्शन बांदेकरची चर्चा होत आहे.

दर्शन बांदेकर हा प्रोफेशनल टेनिस क्रिकेटर आहे. उंच काठी आणि भारदस्त शरीरयष्टी असलेला दर्शन बांदेकर मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. गोलंदाजाने टाकलेला चेंडू मैदानाबाहेर पोहचवणं हा त्याच्या उजव्या हाताचा खेळ आहे. त्याला अनेकदा सलग ६ चेंडूंवर ६ षटकार मारण्याची संधी मिळाली आहे. मात्र त्याने असं कधीच केलं नाही.

काय आहे कारण

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टेनिस क्रिकेटचा सामना सुरु आहे. दर्शन बांदेकर फलंदाजी करतोय. त्यावेळी पहिल्या चेंडूपासून ते पाचव्या चेंडूपर्यंत त्याने सर्व चेंडू सीमारेषेपार पोहोचवले. मात्र सहाव्या चेंडूवर त्याने १ धाव घेतली. दर्शन बांदेकर शेवटच्या चेंडूवर षटकार मारु शतक नव्हता का? तर हो, मारु शकत होता.

मात्र त्याने असं केलं नाही. कारण त्याने अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, जर एखाद्या गोलंदाजाला एखाद्या फलंदाजाने सलग ६ षटकार मारले. तर काही गोलंदाजांचा आत्मविश्वास खालावतो.

तर काही गोलंदाजांनी क्रिकेट खेळणंच सोडून दिलं. त्यामुळे तो कधीच कुठल्या गोलंदाजाला सलग ६ षटकार मारत नाही. सलग ५ षटकार मारुन शेवटच्या चेंडूवर १ धाव घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अनेकदा असं केलं आहे. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT