AUS vs NZ Saam TV
Sports

AUS vs NZ: ओमिक्रॉनमुळे ऑस्ट्रलियाचा न्यूझीलंड दौरा रद्द

हा दौरा ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानसोबतच्या दौऱ्यासोबत सुरु राहणार होता.

वृत्तसंस्था

मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलिया VS न्युझीलंड (AUS vs NZ) दौरा रद्द झाला आहे. या दौऱ्यात वर्ड चॅम्पियन न्युझीलंडसोबत तीन टी-२० सामन्यांची (T-20 Series) मालिका खेळायची होती. दोन्ही देशांच्या क्रिकेट मडळांनी हा निर्णय घेतला आहे. कारण ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला विलगीकरण कक्ष उपलब्ध नव्हता.

न्युझीलंड क्रिकेट (NZC) आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटने या मालिकेचे आयोजन या आधारावर केले होते की सरकार १७-२० मार्च दरम्यान आपल्या कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शिथीलता देईल, परंतु सरकारने तो निर्णय घेतला नाही. हा दौरा ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानसोबतच्या दौऱ्यासोबत सुरु राहणार होता.

न्युझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य अधिकारी डेविड व्हाईट यांनी सांगितले की सिमा भागात घातलेल्या कोरोना निर्बंधांमुळे हा दौरा आम्हाला रद्द करावा लागला आहे. ज्यावेळी आम्ही हा दौरा ठरवला त्यावेळी असे वाटले होते की ट्रांस-तस्मान सिमा कोरोना निर्बंधांचे पालन करणाऱ्या लोकांसाठी खुली होईल.

परंतु ओमिक्रॉनमुळे सिमा भागात सर्व काही बदलले आहे. त्यामुळे परिणामी आम्हाला मालिका रद्द करावी लागली असे अधिकारी म्हणाले. भारतीय महिलांची न्युझीलंडसोबतची मालिका बुधवारपासून सुरु होत आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका VS नेदरलँड मालिका सुरु आहे. आगमी काळात महिलांचा विश्वचषक देखील होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT