IND VS AUS 1st Test: Saam tv
Sports

IND VS AUS 1st Test: भारतीय स्पिनर्स समोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे सरेंडर!अवघ्या १७७ धावांवर आटोपला पहिला डाव

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरु आहे.

Saam Tv

IND VS AUS 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव अवघ्या १७७ धावांवर संपुष्ठात आला आहे.ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली.

तर स्टीव्ह स्मिथने ३६ आणि ॲलेक्स कॅरीने ३१ धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. (Latest sports updates)

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर आर अश्विनने ३ तर मोहमद शमी आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश आले.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव ,रविंद्र जडेजा, केएस भरत,आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११:डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ,पीटर हॅंड्सकॉम्ब, ॲलेक्स कॅरी,पॅट कमिन्स, टॉड मुरपी, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT