Aus vs SA Match Updates  Saam Tv
Sports

Champions Trophy : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना पावसानं धुतला, पाकिस्तानची पोलखोल, नेमकं काय झालं?

Aus vs SA Match Updates : आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या सामन्याचे रावळपिंडी येथे नियोजन करण्यात आले होते. पण स्टेडियमच्या परिसरात पाऊस आल्याने हा सामना रद्द करण्यात आला.

Yash Shirke

Champions Trophy 2025 : आज पाकिस्तानमधल्या रावळपिंडीमध्ये दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना खेळला जाणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. वातावरण खराब झाल्याने नाणेफेकदेखील झाली नाही. सामना काही काळानंतर सुरु होणार असल्याची काही वेळापूर्वी शक्यता वर्तवली जात होती. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने हा नियोजित सामना रद्द करण्यात आला.

रावळपिंडीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु होण्यापूर्वी पाऊस सुरु झाला. त्यामुळे मैदानावर नाणेफेक देखील होऊ शकली नाही. दरम्यान पाकिस्तानच्या भोंगळ कारभारामुळे सामन्याला उशीर झाला असे लोक म्हणत होते. स्टेडियमवर पिच झाकण्यासाठी कव्हर्सची व्यवस्था करण्यात आली नव्हती. यावरुन भारताचा माजी क्रिकेटपटूने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू मौहम्मद कैफ यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कैफने 'रावळपिंडीचे मैदान पूर्णपणे कव्हरने झाकलेले नाही. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सारखा महत्त्वपूर्ण सामना यामुळे आधीच रद्द झाला असता. कोणीही याकडे लक्ष दिले नाही. आयसीसीचा पैस यजमानांनी (पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने) योग्य पद्धतीने वापरला का?' असे लिहिले आहे.

दरम्यान रावळपिंडीतला सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना म्हणजेच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना १-१ गुण मिळाला आहे. त्यामुळे ब गटातील लढत चुरशीची बनली आहे. दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. आजचा सामना रद्द झाल्याने उपांत्यफेरीपर्यंत जाण्याच्या समीकरणांमध्ये मोठा फेरबदल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

SCROLL FOR NEXT