AUS vs BAN Saam tv
Sports

AUS vs BAN: मार्श-स्मिथचा मैदानावर झंझावात; ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर सर्वात मोठा विजय

AUS vs BAN: बांगलादेशने दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून पार करत सामना जिंकला.

Vishal Gangurde

Aus vs Ban:

विश्वचषकात ४३ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सुरू आहे. बांगलादेशनने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला ३०६ धावांचं आव्हान दिलं. बांगलादेशने दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून सामना जिंकला. बांगलादेश पराभूत झाल्याने विश्वचषकातील त्यांचं आव्हानही संपुष्टात आलं आहे. (Latest Marathi News)

बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४४.४ षटकात ८ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून मार्शने १७७ धावांची खेळी खेळली. या दरम्यान मार्शने १७ चौकार आणि ९ षटकार लगावले. तर ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ५३ धावांची खेळी खेळली. स्टीव्ह स्मिथने नाबाद ६३ धावांची खेळी खेळली.

बांगलादेशची ऑस्ट्रेलियाविरोधात फटकेबाजी

बांगलादेशची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात खराब झाली. बांगलादेशला पहिला झटका तंजीदच्या रुपाने बसला. तंजीदने ३४ चेंडूत ६ चौकार लगावत २६ धावा केल्या. तर बांगलादेशला लिटन दासच्या रुपाने दुसरा धक्का बसला. त्याने ४५ चेंडूत ३६ धावा केल्या. शंटो आणि तौहीदने संघाची कमान सांभाळली. बांगलादेशच्या शेवटच्या फलंदाजांनी देखील जोरदार फटकेबाजी केली. या जोरावर बांगलादेशने ५० षटकात ३०६ धावा केल्या.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांगलादेशचं आव्हान संपुष्टात

विश्वचषक स्पर्धेतऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये आज शेवटचा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने ९ सामन्यापैकी ७ सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने या सामन्याआधीच सेमी फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. तर बांगलादेशने या स्पर्धेत फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT