Prithvi Shaw Saam Tv
Sports

Prithvi Shaw : पृथ्वी शाॅच्या मित्राच्या गाडीवर हल्ला; दोन जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

ओशिवरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज सावंत

Prithvi Shaw News : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शाॅ सोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादातून बुधवारी पहाटे पृथ्वी शाॅच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व्यावसायिक हा पृथ्वी शाॅचा मित्र आहे. पृथ्वी शाॅ आणि त्याचा मित्र बड्या हॉटेलमध्ये भेटले. त्यानंतर त्याचा मित्र विमानतळाच्या दिशेने जात होता. त्यावेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शाॅ सोबत सेल्फी काढण्याचा आग्रह केला.

पृथ्वी शाॅसोबत (Prithvi Shaw) सेल्फी काढल्यानंतर पुन्हा सेल्फी काढण्यास दोघांनी आग्रह केल्याने हाॅटेल मॅनेजरने दोन्ही आरोपींना हाॅटेलबाहेर काढले. याचा राग मनात धरून आरोपींनी पृथ्वी शाॅ सोबत असलेला त्याच्या मित्रवर काढला. जोगेश्वरीच्या लोटस पेट्रोल पंप समोर, लिंक रोड येथे त्याची अडवली. आरोपी आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर आरोपींनी तक्रारदाराची गाडी बेसबाॅल स्टीकने फोडली. सुदैवाने पृथ्वी शाॅ त्या गाडीत नव्हता.

त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजाराची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी व्यावसायिकाला दिली. फोडलेली गाडी घेऊन व्यावसायिकाचा चालक ओशिवरा पोलीस ठाण्यात आल्यानंतर व्यावसायिकाच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी सना गिल व शोबित ठाकूरवर कलम 384,143, 148,149, 427,504, 506, भादवि अंतर्गग गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

SCROLL FOR NEXT