asian games 2023 lovelina borgohain won silver medal in boxing twitter
Sports

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांचा पाऊस! लोवलीनाला बॉक्सिंगमध्ये रौप्यपदक

Asian Games 2023 Day 11 LIVE: भारतीय बॉक्सर लवलीनाने भारताला रौप्यपदक जिंकून दिलं आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Day 11 LIVE:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. बुधवारी भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लवलिना बोरगोहेनने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ७५ किलोग्रॅम वजनी गटात रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

सुवर्ण पदकासाठी झालेल्या लढतीत चीनच्या ली कियानने तिचा ५-० ने पराभव केला आहे. हा सामना गमावल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत हे भारताचे २७ वे रौप्यपदक ठरले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ७४ पदकांची कमाई केली आहे. ज्यात १६ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांचा समावेश आहे. (Latest sports updates)

एलीट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकावलं होतं गोल्ड..

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घालणाऱ्या लवलिनाने गेल्या वर्षी एलीट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसेच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत देखील तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

भारतीय हॉकी संघाची अंतिम फेरीत धडक..

आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीचा सेमीफायनलचा सामना भारत आणि दक्षिण कोरीया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत ५-३ ने विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT