asian games 2023 day 9 live sutirtha mukherjee and ayhika mukherjee won bronze medal in table tennis womnes doubles  twitter
Sports

Asian Games 2023: सुतिर्था अन् अयहिका मुखर्जीने रचला इतिहास; वुमन्स टेबल टेनिस डबल्समध्ये भारताला पहिलंच पदक

Asian Games 2023 Day 9 LIVE: सुतिर्था अन् अयहिका मुखर्जी यांच्या जोडीने इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Day 9 LIVE:

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशीही भारतीय खेळाडूंचा दबदबा सुरूच आहे. नवव्या दिवशी भारतीय टेबल टेनिसपटू सुतिर्था आणि अयहिका यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या जोडीने महिलांच्या टेबल टेनिस डबल्स इव्हेंटमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून दिला आहे.

यासह या जोडीने इतिहास रचला आहे. भारताने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेबल टेनिस डबल्समध्ये पदक पटकावलं आहेय क्वार्टर फायनलच्या सामन्यात भारत आणि यजमान चीन या दोघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली.

या सामन्यात बाजी मारत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरीयाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Latest sports updates)

कांस्यपदकाने दिवसाची सुरुवात..

भारतीय खेळाडूंनी नवव्या दिवसाची दमदार सुरूवात केली आहे. भारतीय महिला खेळाडूंनी स्पीड स्केटिंग ३००० मीटर रिले इव्हेंटमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

तर पुरुषांच्या संघाने स्पीड स्केटिंग ३००० मीटर रिले इव्हेंटमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT