indian hockey team  saam tv
Sports

Asian Games 2023: चक दे इंडिया! दक्षिण कोरीयाला ५-३ ने लोळवत टीम इंडियाची हॉकीच्या अंतिम फेरीत धडक

Asian Games 2023 Day 11 LIVE: भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023, India vs South Korea Hockey Match:

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हॉकीमध्ये अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. या स्पर्धेतील सेमी फायनलच्या सामन्यात भारत आणि दक्षिण कोरीया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत ५-३ ने विजय मिळवलं आहे. भारतीय खेळाडूंनी सुरूवातीपासूनच या सामन्यावर पकड बनवून ठेवली होती. आता भारतीय संघांच संपूर्ण लक्ष सुवर्णपदकावर असणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत हा भारतीय हॉकी संघाचा सलग ५ वा विजय आहे. दक्षिण कोरीयाविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने सुरूवातीपासून आघाडी बनवून ठेवली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी ३ गोल केले.

भारताकडून हार्दिक सिंगने ५ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर ११ व्या मिनिटाला मनदिप सिंगने आणि ललित उपाध्यायने १५ व्या मिनिटाला गोल केला. यासह भारतीय संघाने ३-० ची आघाडी घेतली. (Latest sports updates)

भारतीय संघाने ३-० ची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच दक्षिण कोरीया संघातील खेळाडू मान जो जुंगने सलग २ गोल करून संघाचा स्कोअर २-३ पर्यंत पोहचवला. त्यानंतर पेनल्टी कॉर्नरमध्ये भारताला गोल करण्याची संधी मिळाली. या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करत भारतीय खेळाडू अमीत रोहीदासने गोल केला आणि संघाला ४-२ ने आघाडी मिळवून दिली.

हाल्फ टाईमपर्यंत भारतीय संघ ४-२ ने आघाडीवर होता. त्यानंतर जो जुंगने गोलची हॅट्रीक करत आपल्या संघासाठी तिसरा गोल केला. भारताकडून मनदीपने संघासाठी ५ वा गोल केला. यासह भारतीय संघाने या सामन्यात ५-३ ने विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT