IND vs SL Asia Cup Final Saam tv
Sports

IND vs SL Asia Cup Final: सिराज ठरला 'मॅन ऑफ द मॅच'; कुलदीपने पटकावली मॅन ऑफ द 'सीरीज'ची ट्रॉफी, किती मिळालं मानधन?

IND vs SL Asia Cup Final: मोहम्मद सिराजने ७ षटकात सर्वाधिक जलक ६ गडी बाद करत 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे. तर कुलदीप यादवने 'मॅन ऑफ द 'सीरीज'चा मान पटकावला.

Vishal Gangurde

IND vs SL Asia Cup Final:

भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यान आशिया कपचा अंतिम सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला. या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने ७ षटकात सर्वाधिक जलक ६ गडी बाद करत तो 'मॅन ऑफ द मॅच'चा मानकरी ठरला आहे. तर कुलदीप यादवने 'मॅन ऑफ द 'सीरीज'चा मान पटकावला. टीम इंडियाच्या मोठ्या विजयानंतर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)

भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. सिराजने एका षटकात ४ गडी बाद करत नवा इतिहास रचला. एकदिवसीय सामन्याच्या इतिहासात सिराजने सर्वाधिक जलद ५ गडी बाद करण्याचा विक्रम रचला आहे.

सिराजने श्रीलंकेचे १६ चेंडूत ५ गडी माघारी परतवले. या आधी चमिंडा वासने २००३ मध्ये बांगलादेशचे १६ चेंडूत ५ गडी बाद केले होते. मोहम्मद सिराज बेधड गोलंदाजीच्या जीवावर सामनावीर ठरला आहे. मोहम्मद सिराजला ५० हजार डॉलर मिळाले आहे. मोहम्मद सिराजने सामानावीर म्हणून मिळालेलं मानधान मैदानावरील कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा केली.

कुलदीप ठरला मालिकावीर

कुलदीप यादव या आशिया कप स्पर्धेत मालिकावीर ठरला आहे. कुलदीप यादवला पुन्हा एकदा फॉर्म गवसला आहे. कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकलेले पाहायला मिळाले. कुलदीपने ५ सामन्यात २८.३ षटक टाकत १०३ धावा दिल्या.

कुलदीपने या चषकात एकूण ९ गडी बाद केले. कुलदीपची या आशिया कपमध्ये मालिकावीराचा म्हणून घोषित करण्यात आले. कुलदीप हा मालिकावीर झाल्याने १५ हजार डॉलर (12,46,355 रुपये) मिळणार आहे. कुलदीपने त्याच्या यशाचं श्रेय कर्णधार रोहितला दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: ICU मध्ये बेड नाही, स्ट्रेचरवरच उपचार; कूपर रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये उन्हाचा चटका वाढताच रस्त्यावर शुकशुकाट

BJP: माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच पद मिळेल; महिला पदाधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Auto Driver Marathi language : हिंदीसक्तीचा बदला घेण्यासाठी शिंदेसेनेची मराठीसक्ती? EXPLAINER

SCROLL FOR NEXT