Asia Cup 2022 Ravindra Jadeja  SAAM TV
Sports

Asia Cup 2022 : टीम इंडियावर मोठं संकट, संघाला गरज असतानाच धडाकेबाज क्रिकेटपटू स्पर्धेबाहेर

आशिया चषक स्पर्धा महत्वाच्या टप्प्यावर असतानाच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

Nandkumar Joshi

Asia Cup 2022 | मुंबई: आशिया चषक स्पर्धा २०२२ महत्वाच्या टप्प्यावर असतानाच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा हा आशिया चषक २०२२ स्पर्धेबाहेर गेला आहे. बीसीसीआयने शुक्रवारी जडेजा दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर झाल्याची माहिती दिली आहे.

भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर हाँगकाँगलाही दुसऱ्या लढतीत हरवलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची विजयी घोडदौड सुरू असताना आणि महत्वाच्या सुपर फोर फेरीत प्रवेश केलेला असतानाच, टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली. त्याच्या जागी ऑलराउंडर अक्षर पटेल याचा संघात समावेश केला आहे.

जडेजाने पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धच्या लढतींमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. जडेजाच्या पायाला दुखापत झाली आहे. अशा वेळी रवींद्र जडेजाचा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत समावेश करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT