arshdeep singh viral video twitter
Sports

Arshdeep Singh: युवा अर्शदीपचा इंग्लंडमध्ये जलवा! बुलेटच्या स्पीडने चेंडू टाकून स्मिथची उडवली दांडी; स्टंप उडून पडला लांब- VIDEO

Cricket Viral Video: अर्शदीपने शतकवीर फलंदाजाची दांडी गुल केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Arshdeep Singh Wicket Video: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.

आता भारतीय संघातील युवा गोलंदाज, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेट लीग स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. या स्पर्धेत खेळताना त्याने शतकवीर फलंदाजाची दांडी गुल केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अर्शदीप सिंग केंट संघाकडून खेळताना दिसतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, केंट आणि सरे या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात केंटने सरे संघासमोर ५०१ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या धावांचा पाठलाग करताना सरे संघाला ३ षटक अखेर २६३ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान जेमी स्मिथने दमदार शतक झळकावले आहे. (Arshdeep singh Viral Video)

शतकवीर फलंदाजाची उडवली दांडी..

जेमी स्मिथने या डावात फलंदाजी करताना अवघ्या ७७ चेंडूंचा सामना करत ११४ धावांची खेळी केली. जेमी स्मिथ हा केंट संघाच्या अडचणीत वाढ करत होता. मात्र अर्शदीप सिंगने योग्यवेळी त्याच्या इनिंगला फुलस्टॉप दिला.

अर्शदीप सिंगने ऑफ स्टंपच्या बाहेर भन्नाट वेगाने चेंडू टाकला. जो टप्पा पडताच आत आला. फलंदाज जेमी स्मिथला काही कळणार इतक्यात चेंडू दांडी गुल करून गेला होता. अर्शदीप सिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Latest sports updates)

काउंटी क्रिकेट स्पर्धेत त्याने आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. यापूर्वी पहिल्या डावात त्याने इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज बेन फोक्सला देखील आश्चर्यचकित केले होते. त्याने राऊंड द विकेटचा मारा करत त्याला पायचीत करत माघारी धाडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT