arshad nadeem twitter
Sports

Arshad Nadeem: 'भेट म्हणून म्हैस कोण देतं?द्यायचंच होतं तर..' अर्शद नदीमने सासऱ्यांची घेतली फिरकी

Arshad Nadeem Interview: पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर निशाणा साधला. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला मागे सोडत त्याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील फायनलमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं.

मात्र अर्शद नदीमने ९२.९७ मीटर लांब भाला फेकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमवर कौतुकाचा वर्षाव केला गेला. त्याच्या सासऱ्यांनी त्याला म्हैस देण्याची घोषणा केली होती. दरम्यान आता अर्शद नदीमने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भारतात ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर कोट्यवधींचं बक्षीस दिलं जातं. यासह अलीशान गाडीही दिली जाते. मात्र ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शद नदीमला भेट म्हणून म्हैस देण्यात आली. सुवर्ण पदकाहून अधिक चर्चा ही अर्शद नदीमच्या सासऱ्यांनी दिलेल्या म्हशीची झाली.

भेट म्हणून म्हैस कोण देतं

एका मुलाखतीत बोलताना अर्शद नदीमने म्हटले की, 'माझ्या पत्नीने मला सांगितलं की तिचे वडील मला भेट म्हणून म्हैस गिफ्ट करणार आहे. मी तिला म्हटलं की, म्हैसऐवजी मला ५-६ एकर जमीन दिली असती. तशी म्हैसही ठीक आहे.' त्यानंतर अर्शद नदीम आणि पत्रकारही हसू लागला.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

अर्शद नदीमने नीरजविरुद्ध खेळताना यापूर्वी कधीच सुवर्णपदक पटकावलं नव्हतं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने नीरजलाही मागे सोडलं. त्याने दुसराच थ्रो ९२.९७ मीटर लांब फेकला. त्याचा हा थ्रो ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला. या थ्रो मुळे त्याचं सुवर्णपदक पक्क झालं. तर नीरज चोप्राने ८९.४७ मीटर थ्रो करत रौप्यपदकावर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT