arshad nadeem twitter
Sports

Arshad Nadeem Throw: हाच तो क्षण ज्यामुळे नीरज चोप्राचं गोल्ड हुकलं! पाहा अर्शद नदीमचा 92.97 मीटरचा थ्रो - VIDEO

Paris Olympics 2024, Arshad Nadeem Throw: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरचा थ्रो करत ऑलिम्पिक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. पाहा त्या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानचा अर्शद नदीम सोन्यासारखा चमकलाय. भालाफेक प्रकारात नीरज चोप्राला कडवी झुंज देणाऱ्या अर्शद नदीमने सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या नीरज चोप्राला मागे सोडत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील सुवर्ण पदकावर निशाणा साधला आहे. यादरम्यान त्याने ऑलिम्पिक रेकॉर्ड ब्रेकिंग थ्रो केला आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र अर्शद नदीम हे आव्हान स्वीकारलं आणि नीरज चोप्राला मागे सोडत दुसऱ्याच प्रयत्नात सुवर्ण पदकासाठी दावा ठोकला. पहिला प्रयत्न फाऊल गेल्यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब भाला फेकला. हा ऑलिम्पिक स्पर्धेतील रेकॉर्ड आहे. या थ्रो सह अर्शद नदीमची इतिहासात नोंद झाली आहे. यापूर्वी कुठल्याही खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेत इतक्या लांब भाला फेकला नव्हता.

नीरज चोप्राला रौप्य पदक

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फाऊल थ्रो केला होता. त्यामुळे त्याचा हा थ्रो काऊंट करण्यात आला नव्हता. मात्र दुसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्राने पूर्ण जोर लावला आणि ८९.४५ मीटर लांब भाला फेकत आपला वैयक्तिक सर्वश्रेष्ठ थ्रो केला. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो ठरला आहे. या थ्रो नंतर त्याला सुवर्ण पदक जिंकण्यासाठी ९३ मीटर लांब भाला फेकायचा होता. मात्र तो असं करू शकला नाही. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

अर्शदच्या थ्रो ने नीरजचं टेन्शन वाढलं?

अर्शदने ९२.९८ मीटर लांब थ्रो केल्यानंतर नीरज चोप्रावरील दबाव वाढत चालला होता. या नादात नीरजकडून फाऊल थ्रो ही झाले. मात्र रौप्य पदक जिंकूनही त्याने इतिहास रचला आहे. तो ऑलिम्पिक स्पर्धेतील ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये सलग २ पदकं जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. यापूर्वी त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT