pakistan cricket team  saam tv
Sports

Arshad Khan: एकवेळ सचिन,सेहवागला बाद करणारा क्रिकेटर आज झालाय टॅक्सी ड्रायव्हर

Pakistan Cricketer Driving Taxi: एकेकाळी सचिनची विकेट घेणारा हा खेळाडू गरीबीत जीवन जगत आहे.

Ankush Dhavre

Pakistan's Cricketer Who Became Taxi Driver:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला क्रिकेटपटू गरीब, हे ऐकायला थोडं वेगळं वाटतं ना? वाटायलाच हवं. कारण भारतीय संघासाठी जेव्हा एखादा खेळाडू खेळतो तेव्हा त्याच्यावर पैशांचा वर्षाव केला जातो. मात्र शेजारील राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानातील परिस्थिती ही फार वेगळी आहे.

पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू अरशद खानने २००६ मध्ये भारतीय संघाविरूद्ध झालेल्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र आता हा खेळाडू गरीबीत जीवन जगत आहे.

अरशद खानने १९९७-९८ मध्ये पाकिस्तान संघासाठी पदार्पण केलं होतं. मात्र आता या खेळाडूवर खुप वाईट वेळ आली आहे. आपला कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी या खेळाडूला सिडनीमध्ये टॅक्सी चालवावी लागतेय. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूवर अशी वेळ येणं नक्कीच क्रिकेच फॅन्सच्या काळजाला चटका लावून जाणारी आहे.

अरशद खानने आपल्या पहिल्याच सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विकेट मिळवली होती. तर भारतीय संघातील आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील त्याच्या गोलंदाजीवर संघर्ष करताना दिसून आला होता. तसेच इंडियन सुपर लीग स्पर्धेत त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेटला राम राम केल्यानंतर या खेळाडूवर पैशांची तंगी आली. त्यमुळे त्याला टॅक्सी चालवावी लागत आहे. (Latest sports updates)

अरशद खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९ कसोटी सामन्यांमध्ये ३२ गडी बाद केले होते. तर ६० वनडे सामन्यांमध्ये त्याने ५७ गडी बाद केले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड दमदार राहीला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६०१ तर १८९ लि्स्ट ए सामन्यांमध्ये १८९ गडी बाद केले आहेत.

या भारतीय फलंदाजांना केलंय बाद..

अरशद खान हा फारशा लोकांना माहितही नसेल. मात्र याच गोलंदाजाने दिग्गज भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे. त्याने वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये सचिन तेंडूलकरसह एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफसारख्या फलंदाजांना बाद केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT