Pravin Jadhav  
Sports

Tokyo Olympics प्रवीणचे आव्हान संपुष्टात; भारतीयांची निराशा

Siddharth Latkar

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) भारतीय संघाचा तिरंदाज प्रवीण जाधव याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या अमेरिकाच्या एलिसनने प्रवीणला एकतर्फी हरविले.

अत्यंत खडतर परिश्रमातून प्रवीण जाधव याने टोकियो ऑलिम्पिकचे ध्येय गाठले हाेते. साता-यातील फलटण तालुक्यातील सरडे या गावापासून त्याने आपले क्रीडा क्षेत्रातील करिअरचा हा महत्वाचा टप्पा गाठला हाेता.

या स्पर्धेत त्याचा अमेरिकाच्या एलिसनने 6-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिला सेट यूएसए एलिसन 9 आणि 10 ने गुण मिळविले. प्रवीणने 9 आणि 8 गुण मिळविले. प्रवीणने पुनरागमन करीत पुन्हा 10 गुण मिळविले परंतु एलिसनने 9 गुण मिळविले हाेते. त्यामुळे गुण तक्ता अमेरिकाच्या बाजूने 28-27 असा राहिला.

दूस-या सेटमध्ये प्रवीणने 10, 9, 7 तर एलिसनचा 8, 10, 9 असा वेध राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीयांची निराशा झाली. एलिसनने 27 तर प्रवीणने 26 गुण मिळविले. तिस-या सेटमध्ये एलिसनने 8, 9, 9 (26 गुण) तर प्रवीणने 8, 8, 7 (23) असे गुण मिळविले.

या सामन्यात प्रवीणचा पराभव झाल्याने भारतीयांची निराशा झाली.

प्रवीणने बाजारचापोव्हला 6-0 ने हरविले

दरम्यान टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) भारतीय संघाचा तिरंदाज प्रवीण जाधवने याने जागतिक क्रमावारीत दूस-या स्थानी असलेल्या रशियाच्या गल्सन बाजारचापोव्ह याच 6-0 ने पराभव केला.

प्रवीणने Pravin Jadhav बाजारचापोव्हला तिन्ही सेटमध्ये हरविले. हा सामना एकतर्फी जिंकणा-या प्रवीणवर शुभेच्छांचा वर्षाव हाेउ लागला आहे. प्रवीणने पहिल्या सेटमध्ये 29, दूस-या सेटमध्ये 28 तसेच तिस-या सेटमध्ये 28 गुण मिळविले. प्रतिस्पर्धी बाजारचापोव्हला अनुक्रमे 27, 27, 24 असे गुण मिळविता आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT