Andre Russell 6 Balls 6 Sixes Saam TV
Sports

आंद्रे अंदर गेंद बाहर! रसेलने सलग ६ चेंडूत ठोकले ६ षटकार; पाहा VIDEO

रसेलने सलग ६ चेंडूत ६ षटकार लगावले.

Satish Daud

Andre Russell 6 Balls 6 Sixes : वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याने पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवलं. रसेलने 6IXTY स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. इतकंच नाही तर, त्याने सलग ६ चेंडूत ६ षटकारही लगावले. हा सामना त्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स यांच्यात खेळला गेला.

रसेलने त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सविरुद्ध ७२ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार खेचले. फलंदाजी दरम्यान रसेलने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची हवा काढून टाकली. रसेलनेही सलग सहा चेंडूंत सहा षटकार ठोकत त्याने भीमपराक्रही केला.

परंतु हे सर्व षटकार रसेलच्या बॅटमधून एकाच षटकात आले नाहीत. खरं तर रसेलने प्रथम डॉमिनिक ड्रेक्सविरुद्ध शेवटच्या चार चेंडूंवर चार षटकार मारले आणि त्यानंतर पुढच्याच षटकात जॉन रस जग्सरने पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन उत्तुंग षटकार मारून हा पराक्रम पूर्ण केला. रसेलच्या खेळीच्या जोरावर त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने १० षटकांत १५५ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT