Video: अमेरिकेतही उन्मुक्त चंदची बॅट शांत! सामन्यात '0' वर बाद Saam Tv
Sports

Video: अमेरिकेतही उन्मुक्त चंदची बॅट शांत! सामन्यात '0' वर बाद

भारताचा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा क्रिकेटपटू उन्मुक्त चंदने (Unmukt Chnad) अलीकडेच भारतीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती जाहीर केली.

वृत्तसंस्था

भारताचा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा क्रिकेटपटू उन्मुक्त चंदने (Unmukt Chnad) अलीकडेच भारतीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती जाहीर केली. उन्मुक्तने निवृत्तीनंतर अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये (American Cricket Leauge) खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या मायनर क्रिकेट लीगशी करारही केला होता. अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये आपला पहिलाच सामना खेळताना उन्मुक्त चंद पुन्हा अपयशी ठरला आहे. सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघाच्या वतीने या स्पर्धेत खेळताना उन्मुक्त एकही धावा न करता बाद झाला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटूने सिलिकॉन व्हॅलीसाठी डावाची सुरुवात केली होती. पण तो आपल्या पहिल्या डावात खाते न उघडता क्लीन बोल्ट झाला आहे. त्याच्या डावादरम्यान, उन्मुक्तने 3 चेंडू खेळले पण त्याला एकही धाव करता आली नाही. उन्मुक्त क्लीन बोल्ड असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर चाहते चंदच्या पदार्पणाच्या सामन्याबद्दल बोलत आहेत. तसे, उन्मुक्त चंदच्या चाहत्यांना विश्वास आहे की तो आगामी सामन्यात चांगली कामगिरी करेल आणि अमेरिकन क्रिकेटमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करेल.

चंद 6 वर्षे आयपीएलमध्ये खेळला आहे, त्या दरम्यान तो मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स तसेच राजस्थान रॉयल्सच्या संघाचा एक भाग होता. त्याने आयपीएलच्या 21 सामन्यांमध्ये अवघ्या 15 च्या सरासरीने 300 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये फक्त एक अर्धशतक आहे. याशिवाय चंदने 67 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 31.57 च्या सरासरीने 3379 धावा केल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT