Cristiano Ronaldo  Saam Tv
Sports

स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोवर केला होता बलात्काराचा आरोप, न्यायालयात झाली सुनावणी

क्रिस्टीयानो रोनाल्डोवर १३ वर्षांपूर्वी एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : पोर्तुगलचा कर्णधार आणि मॅंचेस्टर युनायटेडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डोवर (Cristiano Ronaldo) १३ वर्षांपूर्वी एका महिलेनं बलात्काराचा आरोप (Rape case) केला होता. त्यानंतर या प्रकरणी अमेरिकेच्या कोर्टात (American Court) खटलाही दाखल करण्यात आला होता. न्यायालयात या खटल्याची सुनावणी नुकतीच झाली असून रोनाल्डोची निर्दोष मुक्तता झाली आहे. खटल्याची कारवाई थांबल्याने रोनाल्डोला दिलासा मिळाला आहे.

कॅथरीन मायोग्रा नावाच्या एका मॉडेलने २००९ साली रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप केला होता. लास वेगासच्या एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने अतिप्रसंग करत बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेनं केला होता. बलात्काराचे गंभीर आरोप करत मायोग्राने रोनाल्डोवर खटला दाखल केला होता. त्यावेळी रोनाल्डोने मायोग्राने केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. तसेच नुकसान भरपाई म्हणून कॅथरीन मायोग्राने रोनाल्डोकडे ३.७५ लाख अमेरिकन डॉलर्सची मागणीही केली होती.

मात्र, त्यानंतर हे प्रकरण अमेरिकेच्या न्यायालयात गेले. दरम्यान, शनिवारी या खटल्याची सुनावणी अमेरिकन न्यायालयात झाली. विशेष म्हणजे ४२ पानी निकालपत्रात न्यायालयाने रोनाल्डोची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली. तसेच मायोग्राच्या वकिलांनी अयोग्य पद्धतीने न्यायललीयन प्रकियेचे पालन केले, असा ठपकाही ४२ पानी निकालपत्रात ठेवण्यात आलाय.

तसेच ही प्रक्रिया पक्षकारांकडून योग्य पद्धतीने चालवली गेली नाही. त्यामुळे हा खटला सुनावणीसाठी पुढे चालवला जाणार नाही, असं महत्वाचं निरिक्षण अमेरिकन न्यायालयानं नोंदवलं आहे. पुराव्यांअभावी रोनाल्डो विरोधात तक्रार दाखल करता येणार नाही, असंही निरिक्षण २०१९ मध्ये न्यायालयाने नोंदवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT