australia team  saam tv
Sports

IND VS AUS: 'चौथा कसोटी सामना आम्हीच जिंकणार..'निर्णायक सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूचे टीम इंडियाला ओपन चॅलेंज

या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूने भारतीय संघाला ओपन चॅलेंज दिले आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS 4th test Alex carey: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला होता. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक करत ९ गडी राखून विजय मिळवला होता.

सध्या या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. मात्र अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला ही मालिका बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे.

या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूने भारतीय संघाला ओपन चॅलेंज दिले आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलिया संघातील यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने भारतीय संघाला बजावून सांगितलं आहे की, आम्ही अंतिम कसोटीत पूर्ण तयारीसह मैदानात उतरणार आहे. पत्रकार परिषदेत त्याने स्पष्ट केले आहे की, ऑस्ट्रलियाचे खेळाडू डिफेंसिव खेळ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

आपल्या फलंदाजीबाबत केला मोठा खुलासा..

ॲलेक्स कॅरीने आपल्या फलंदाजीबाबत खुलासा करत म्हटले की,'मी माझा नैसर्गिक खेळ करणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात माझा आत्मविश्वास खालावलेला होता. तर दुसऱ्या कसोटीत मी डिफेंसिव शॉट खेळण्याच्या नादात बाद झालो. मी आता स्वीप शॉटचा देखील वापर करणार आहे.' या मालिकेत ॲलेक्स कॅरीला मोठी खेळी करता आली नाहीये. ३६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना..

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाला ही मालिका बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने तिसरा कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: पोटावरील हट्टी चरबी कमी करायची आहे? रोज करा हे 5 सोपे व्यायाम

लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात; २ दिवसांत ६ जणांचा अपघाती मृत्यू

High Cholesterol Risk: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी शांतपणे रक्तवाहिन्यांमध्ये जमा करतायत चरबी

Maharashtra News Live Update: वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू

वीज समस्येवर जनआक्रोश; 700 नागरिकांचा सह्यांमधून संताप

SCROLL FOR NEXT