KKR vs PBKS Ajinkya Rahane and Shreyas iyer /IPL /X saam tv
Sports

KKR vs PBKS : अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय; जगातील नंबर १ खेळाडूसह दोन दिग्गजांना बाहेरचा रस्ता

KKR vs PBKS Match Update : आयपीएलच्या सुरुवातीलाच दोन सामने गमावलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय घेतला आहे. जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि धाकड ऑलराउंडर असलेल्या खेळाडूला प्लेइंग ११ मध्ये संधी देण्यात आली नाही. काय आहेत कारणे जाणून घ्या...

Nandkumar Joshi

आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर टीकेचा धनी ठरलेला कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं आज पंजाब किंग्जविरोधात होणाऱ्या सामन्यात आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघानं प्लेइंग ११ मध्ये दोन बदल केले आहेत. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगात क्रमांक एकवर असेलला गोलंदाज वरूण चक्रवर्ती आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांना फलंदाजीनं धडकी भरवणारा आणि जादुई फिरकीनं फलंदाजांना गिरक्या घ्यायला लावणारा सुनील नरेन या दोघांना प्लेइंग ११ मध्ये संधी दिलेली नाही. त्यांना पंजाबविरुद्धच्या सामन्यात बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल स्पर्धेतील १२ वा सामना आज, सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. कोलकातानं याआधीचे दोन्ही सामने गमावले आहेत. तर पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकून किंग असल्याचे दाखवून दिले आहे. हा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये होत आहे. दोन्ही संघ या सीझनमधील तिसरा सामना खेळत आहेत. केकेआरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं संघात दोन बदल केले आहेत. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन आजचा सामना खेळणार नाहीत. वरुण हा दुखापतीमुळं खेळत नाही. तर सुनील नरेनची तब्येत ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोलकाता संघाने रोवमॅन पॉवेल आणि नवदीप सैनी या दोघांना संधी दिली आहे. सैनीचा या मोसमातील पहिलाच सामना असेल. तर पंजाब किंग्जने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाता संघ विजय मिळवण्यास उत्सुक आहे. रहाणेच्या कोलकाता संघाला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स तर, दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं पराभूत केलं होतं. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब संघ सलग तिसरा विजय मिळवून आयपीएलमधील विजयीरथ कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहे.

कोलकाताची प्लेईंग ११ KKR Playing XI

फीन अॅलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमरून ग्रीन, अंगक्रीश रघुवंशी (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, रिंकु सिंह, रामणदीप सिंग, अनुकूल रॉय, नवदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी

इम्पॅक्ट प्लेअर - मनीष पांडे, जेजस्वी सिंह, राहुल त्रिपाठी, सौरभ दुबे, ब्लेसिंग मुजरबानी

पंजाबच्या ताफ्यात कोण कोण? PBKS Playing XI

प्रभसिमरन सिंह (विकेकीपर), कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर - सुर्यांश शेंडगे, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, प्रियांश आर्या, हरप्रीत ब्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मामीचा कारनामा, १० वर्षे लहान भाच्यासोबत फुर्रर्रर्र...! मंदिरात जाते असं सांगून घरातून निघाली ती परतलीच नाही

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर शरद पवार यांचं मोठं विधान

Maharashtra News Live Update: कोलकाता नाईट रायडर्सचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

Bhooth Bangla Trailer Review: नव्या चित्रपटाचा जुना ट्रेलर; अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये 'भागमभाग', 'भूल भुलैया'ची खिचडी

Goa Tourism : गोव्यातील 'हा' समुद्रकिनारा रात्री हिऱ्यासारखा चमकतो, पाहताच क्षणी सौंदर्यात हरवून जाल

SCROLL FOR NEXT