viral cricket video twitter
Sports

Viral Cricket Video: सूपला शॉटला विसरा आता मार्केटमध्ये आलाय 'झोपल्या शॉट',VIDEO होतोय व्हायरल

Supla Shot Video: या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Viral Cricket Shot: क्रिकेटचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एखादा फिल्डर डाइव्ह मारून झेल टिपतो. तर कधी अंपायर डान्स करताना दिसून येत असतो. काही दिवसांपासून सोशल मीडियावर सूपला शॉटची चर्चा सुरु आहे. मात्र या शॉटला आता तोडीस तोड उत्तर देणारा झोपल्या शॉटचे आगमन झाले आहे. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सूपला शॉटला टक्कर देणारा शॉट ..

क्रिकेटमध्ये तुम्ही एकापेक्षा एक भन्नाट शॉट पहिले असतील. मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव हा मैदानाच्या चारही बाजूंना शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो.

त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना गोलंदाज देखील विचारात पडतात की, याला नेमका चेंडू टाकायचा तरी कुठं. असाच काहीसा शॉट टेनिस क्रिकेट स्पर्धेत एका फलंदाजाने मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की , गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. कारण चेंडू फुल टॉस पडला. या चेंडूवर फलंदाजाने झोपत भन्नाट शॉट मारला. झोपून मारला असला तरीदेखील या फलंदाजाच्या मनगटात इतकी ताकद होती की, चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर गेला. या षटकारनंतर समालोचकाने या शॉटला झोपल्या शॉट असे म्हटले आहे. (Latest sports updates)

टेनिस क्रिकेटची वाढती लोकप्रियता..

टेनिस क्रिकेटची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आधी टेनिस स्पर्धांचे आयोजन खूप कमी प्रमाणात केले जायचे. मात्र लोकप्रियता वाढल्यापासून प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

या स्पर्धांमध्ये विजयी संघांना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. तसेहच काही असे देखील खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकटमध्ये नाव कमावल्यानंतर थेट राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT