Aniket Jadhav Saam Tv
Sports

AFC U-23 Asian Cup: फुटबाॅलपटू अनिकेत जाधव भारतीय संघात; काेल्हापूरात जल्लाेष

यापुर्वी अनिकेतची १७ वर्षांखालील युवा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती.

साम न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलपटू अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याची भारतीय फुटबॉल (indian football team) संघात निवड झाली आहे. अनिकेतच्या निवडीने काेल्हापूराच्या (kolhapur) शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा राेवला गेल्याने त्याचे काैतुक हाेत आहे. (aniket jadhav in indian football team)

संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे २३ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत आशियाई फुटबाॅल स्पर्धा (AFC U-23 Asian Cup) हाेईल. या स्पर्धेसाठी अनिकेतची संभाव्य भारतीय संघात निवड झाली आहे.

यापुर्वी अनिकेतने १७ वर्षांखालील गटात विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या अनिकेत इंडियन सुपर लीग स्पर्धेत (Indian Super League) हैदराबाद एफसी (Hyderabad FC) संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. दरम्यान फुटबॉल खेळाचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरसाठी (sports) अनिकेतची भारतीय संघात झालेली निवड निश्चित अभिमानास्पद असल्याचे सांगितले जात असून त्याच्यासह त्याचे प्रशिक्षक तसेच पालक यांचे समाज माध्यमातून अभिनंदन केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT