Zaheer Khan And Sagarika Ghatge Welcome Baby Boy saam tv
Sports

Zaheer Khan : झहीर खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाचं नाव ठेवलंय अगदी युनिक!

Zaheer Khan And Sagarika Ghatge Welcome Baby Boy: टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान बाबा झाला आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं असून याबाबत त्याने सोशल मीडियावरून माहिती दिलीये.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि लखनऊ सुपर जाएंट्सचा कोच झहीर खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नुकतंच झहीर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या कुशीत चिमुकलं छोटं बाळ आहे. दोघांनीही बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी लहानग्या मुलाचं आगमन झाल्याची बातमी चाहत्यांना दिली.

काय ठेवलं बाळाचं नाव?

सागरिका आणि झहीर यांनी त्यांच्या मुलाचं नाव फतेहसिंह असं ठेवलं आहे. याची माहिती देखील त्यांनी सोशल मीडियावरून दिलीये. यावेळी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोच्या कॅप्सनमध्ये म्हटलंय की, "प्रेम, कृतज्ञता आणि दैवाच्या आशीर्वादांसह आम्ही आमचा चिमुकला मुलगा फतेहसिंह खानचं स्वागत करतो." या लाडक्या कपलवर आता चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

चाहत्यांकडून दोघांचं अभिनंदन

सागरिका आणि झहीर यांनी ही आनंदाची बातमी सोसल मीडियावर शेअर केल्यानंतर दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होतोय. चाहते या फोटोंवर कमेंट करून त्याचं अभिनंदन करतायत. यामध्ये अंगद बेदी, सुरेश रैना, आरपी सिंग यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे.

झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं २०१७ मध्ये लग्न झालं होतं. २०१६ मध्ये युवराज सिंग आणि हेझल कीच यांच्या लग्नादरम्यान त्यांनी त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

खाडssss... कानाखाली जोरात लगावली; संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा जीव घेतला

Mangal Gochar: मंगळ ग्रह राशी बदलताच येणार अच्छे दिन; ४ राशींचं नशीब पालटणार,घरी येणार पैसाच पैसा

Tuesday Horoscope: पगार वाढ होणार, ५ राशींच्या अडचणी दूर होणार; वाचा मंगळवारचे खास राशीभविष्य

गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळा...विराट कोहली-अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या दरबारी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT