akash sakharkar saam tv
Sports

Ashish Sakharkar Passes Away: मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्सचा मान पटकावणाऱ्या मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन

Ashish Sakharkar: महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजवणाऱ्या बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन झालं आहे.

Ankush Dhavre

आशिष साखरकर : महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजवणाऱ्या बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. या गंभीर आजारामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. (Ashish Sakharkar )

महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजवलं..

आशिष साखरकर यांनी मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर इंडिया आणि महाराष्ट्र श्री सारख्या स्पर्धांमध्ये जेतेपदं पटकावली होती. केवळ महाराष्ट्रात किंवा देशात नव्हे तर जगभरात अनके मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता.

ते देशातील लोकप्रिय बॉडीबिल्डर्सपैकी एक होते. त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या शेवटच्या पोस्टवर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली आहे. (Latest sports updates)

तसेच आशिष साखरकर यांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी ४ वेळा फेडरेशन कप, ४ वेळा मिस्टर इंडिया, मिस्टर आशिया स्पर्धेत रौप्य, मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत रौप्य, तसेच युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. यासह त्यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT