Divya Deshmukh Saam Tv
Sports

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख विजेती; एरिगैसीही विजयी

एरिगैसीच्या विजयाने तेलंगणा राज्यातील बुद्धीबळपटूंत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

साम न्यूज नेटवर्क

कानपुर : वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद (senior national chess championship) स्पर्धेत तेलंगणाच्या अर्जुन एरिगैसीने (Arjun Erigaisi) निर्विवाद वर्चस्व सिद्ध करीत प्रथम क्रमांकाचे सहा लाखांचे पारिताेषिक पटकाविले. या स्पर्धेत ११ व्या फेरीत अर्जुनने ८.५ गुण मिळवित हे यश संपादन केले. दरम्यान नागपूरच्या (Nagpur) १६ वर्षीय दिव्या देशमखुने (Divya Deshmukh) या स्पर्धेत आठ गुण मिळवून महिला गटात विजेतेपद पटकाविले आहे. (Arjun Erigaisi and Divya Deshmukh becomes the 2022 Indian National Chess Champion)

महिला गटात दिव्याने बुधवारी तिच्या पहिल्या MPL राष्ट्रीय महिला बुद्धिबळ (chess) विजेतेपदावर सौम्या स्वामिनाथनसोबत १८ चालींचा खेळ करीत शिक्कामाेर्तब केला. १६ वर्षीय दिव्याने नऊ फेऱ्यांच्या स्पर्धेत तिच्या आठव्या मानांकनावर खेळ केला आठ गुण मिळवले. तिने पाच लाख ५० हजारांचे पारिताेषिक पटकावले.

दरम्यान पुरुष गटात देशातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर असलेल्या गुकेशने (D. Gukesh) अर्जुनच्या आठ गुणांची बरोबरी करण्यासाठी रुक-अँड-पॉन एंडगेममध्ये ६४ चालांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला हाेता. त्यापुर्वी अर्जुनने ग्रँडमास्टर पी. इनियान सोबत ४१ चालींमध्ये सामना ड्रॉ केला.

या स्पर्धेत दहाव्या फेरीत गुकेश आणि एरिगैसी यांच्याकडे अर्ध्या गुणांची आघाडी आहे. १८ वर्षीय अर्जुनने आणि १६ वर्षीय दिव्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे क्रीडा (sports) क्षेत्रात काैतुक हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT