cricket viral video twitter
Sports

Viral Cricket Video: टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागडा चेंडू! पठ्ठ्याने एकाच चेंडूवर खर्च केल्या तब्बल १८ धावा; VIDEO एकदा पाहाच

Costliest Over In Cricket: एका गोलंदाजाने डावातील शेवटच्या चेंडूवर ४,६ नव्हे तर तब्बल १८ धावा खर्च केल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

TNPL 2023: टी -२० क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही. युवराज सिंग सलग ६ षटकार मारेल असा कोणीच विचार केला नव्हता. आयपीएल २०२३ स्पर्धेत रिंकू सिंगने देखील अंतिम षटकात ३० धावा ठोकल्या.

हे झालं धावांचा पाऊस पाडण्याबाबत. मात्र कधी कधी १ धाव करणंही कठीण होऊन जातं. दरम्यान एका गोलंदाजाने डावातील शेवटच्या चेंडूवर ४,६ नव्हे तर तब्बल १८ धावा खर्च केल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

एका चेंडूवर बनवल्या गेल्या १८ धावा...

हा कारनामा तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत घडला आहे. तर झाले असे की, गोलंदाज अभिषेक तंवर गोलंदाजी करत होता. त्याने डावातील शेवटच्या चेंडूवर, फलंदाजी करत असलेल्या संजय यादवची दांडी गुल केली.

विकेट घेतल्यानंतर तो जोरदार जल्लोष करताना दिसून आला. मात्र मागे वळून पाहिलं तर अंपायरने हा चेंडू नो चेंडू असल्याचा निर्णय दिला. नो चेंडू म्हणजे फ्री हिट. संजयला जीवदान मिळालं आणि त्याने याचा चांगलाच फायदा घेतला.

फ्री हिटवर संजयने खणखणीत षटकार मारला. मात्र अभिषेकचं नशीब इतकं खराब होतं की, हा चेंडू देखील नो चेंडू होता. आतापर्यंत त्याने १ चेंडूवर ८ धावा खर्च केल्या होत्या. पुढील चेंडू त्याने चांगला टाकला, ज्यावर फलंदाजाने २ धावा काढल्या. (Latest sports updates)

मात्र हा चेंडू देखील नो चेंडू होता. सतत नो चेंडू टाकत असलेल्या अभिषेकने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी देखील त्याला नशिबाने साथ दिली नाही. यावेळी त्याने वाईड चेंडू टाकला.

आतापर्यंत त्याने १२ धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू निर्धाव टाकेल असं वाटत असताना फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर देखील षटकार मारला. यासह गोलंदाजाने एकाच षटकात १८ धावा खर्च केल्या.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात चेपॉक सुपर गिल्स आणि सलेम स्पार्टन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. चेपॉक सुपर गिल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद २१७ धावा केल्या होत्या. तर या धावांचा पाठलाग करताना सलेम स्पार्टन्स संघाला १६९ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT