Shurkra Transit Saam tv
आध्यात्मिक

Rashi Transit : ३१ मार्चनंतर येणार राजयोग; शुक्राच्या संक्रमनामुळे ३ राशींच्या लोकांसाठी येणार अच्छे दिन

Shurkra Transit : ग्रहांच्या संक्रमनामुळे राशींवर प्रभाव पडत असतो. एका ठाराविक वेळेनंतर ग्रह आपल्या स्थान सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. इतर ग्रहांप्रमाणे शुक्र ग्रह सुद्धा संक्रमण करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Venus Shurkra Transit :

ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर पडत असतो. प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर आपलं स्थान बदलत असतो.इतर ग्रहांप्रमाणे शुक्र ग्रह सुद्धा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ३१ मार्चला धन, भौतिक सुख आणि ऐश्वर्य देणारा ग्रह शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे. शुक्र मीन राशीत प्रवशे केल्याने राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग ३ राशींसांठी खूप फायदेशीर ठरणार आहे. (Latest News)

मिथुन राशी

मीन राशीमध्ये शुक्र संक्रमनामुळे होणाऱ्या राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. ३१ मार्चनंतर या राशीच्या लोकांचे अच्छे दिन येणार आहेत. या राशी असलेल्या लोकांच्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि त्यांना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न वाढ होईल. जे लोक व्यावसायीक आहेत त्यांच्यासाठी देखील हा काळ चांगला असणार आहे. नवीन महत्त्वाचे व्यवहार होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यां उमेदवारांना यश मिळू शकते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे संक्रमण लाभदायी असणार आहे. नोकरदार लोकांना बढती मिळू शकते. तर काहींचा पगार वाढवण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा केली जाण्याची शक्यता असून तुमचा बॉस तुमचं कौतुक करेल. तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा या संक्रमणाचा लाभ होईल.अनेकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळणार असून अनेकांचा समाजात मान-सन्मान वाढेल. राजयोगामुळे अनेकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी राजयोग लाभदायक ठरेल. तुम्ही नवीन मालमत्तेचे किंवा वाहनाचे मालक होऊ शकता.अनेकांना त्यांच्या सरकारी कामात फायदा होईल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतील. जोडीदाराशी नाते घट्ट होईल. कोणत्याही छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण एकमेकांना नम्रपणे समजून घेतले तर तुमचे नाते सुधरू शकते.

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि ज्योतिषशास्त्रावरून घेण्यात आलीय. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT