Shukra Gochar 2024 Saam Tv
आध्यात्मिक

Shukra Gochar 2024: शुक्राच्या राशी बदलामुळे 'या' ३ राशी होणार धनवान

Shukra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक राशींचे ग्रह आणि नक्षत्र बदलत आहेत. काही राशींना याचा फायदा होईल, तर काहींच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shukra Gochar 2024: एका दिवसानंतर मे महिना सुरू होईल. आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मे महिन्यात काही राशीच्या लोकांच्या नशिबाची दारे उघडू शकतात. पुढील महिन्यात अनेकांची स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेकांना सुखाची बातमी समजेल.

१६ मे २०२४ रोजी शुक्राचे नक्षत्र बदलत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवार, १६ मे रोजी दुपारी ३:४८ वाजता शुक्र कृत्तिकामध्ये प्रवेश करेल. या वर्षी शुक्राच्या संक्रमणामुळे तीन राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो.

मिथुन

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांना शुक्र नक्षत्रातील बदलाचा फायदा होऊ शकतो. ज्या लोकांचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो त्यांना मिळेल. ज्या लोकांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या दूर होत त्यात सुधारणा होईल.

कर्क

शुक्र कृत्तिका नक्षत्रात प्रवेश केल्याने कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल, यामुळे समाजात त्यांचा मान-सन्मानही वाढेल. जे लोक बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या कानावर लवकरच आनंदाची बातमी येईल.

मीन

सध्या मीन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. प्रत्येक कामात नशीब त्यांना मदत करेल. अनेकांची सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण होतील. याशिवाय ज्या लोकांनी कुठेही गुंतवणूक केली असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या गुंतवणूकाचा फायदा त्यांना पुढील काळात होईल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तोंडाचा वास येणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; दुर्लक्ष न करता वेळीच घ्या दातांची काळजी

Maharashtra News Live Update:पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ भागातील कारखान्यावर छापा

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ८ दिवसांत विश्वासू मदाराला फोडलं

India vs England: आयरलँडनंतर आता इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची अग्निपरीक्षा, पाहा कसं आहे शेड्यूल?

July 1 New Rules : आज शेवटची संधी! आयकर, LPG सबसिडी, पासपोर्ट आणि रेल्वे प्रवासाशी संबंधित ही महत्त्वाची कामे लगेच पूर्ण करा

SCROLL FOR NEXT