Vastu tips, pros and cons of laughing buddha ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा कुठे ठेवाल ?

लाफिंग बुद्ध हा चिनी सभ्यतेच्या फेंगशुई मधून आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यातल्या काही वास्तुशास्त्रानुसार असतात तर काही आपल्याला आवडलेल्या असतात त्यापैकी एक लाफिंग बुद्धा.

हे देखील पहा -

लाफिंग बुद्ध हा चिनी सभ्यतेच्या फेंगशुई मधून आला असला तरी त्याच्या हसण्याच्या आकर्षकतेमुळे व काहीतरी नवीन म्हणून तो आपल्या घरात असतो. परंतु, लाफिंग बुद्धाला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाला सुख आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. योग्य दिशा आणि वास्तूनुसार जर लाफिंग बुद्धा घरात (Home) ठेवल्यास घरामध्ये पैश्या संबंधित अडचणी कमी होतात. आपल्यापैकी बरेच जण त्यांच्या कामाच्या ठिकाणी लाफिंग बुद्ध ठेवतात. वास्तूनुसार घरात काही ठिकाणे अशी आहेत जिथे लाफिंग बुद्ध ठेवू नये असे सांगितले जाते. लाफिंग बुद्ध घर कोणत्या ठिकाणी, घर कसे ठेवावे याविषयी जाणून घेऊया.

लाफिंग बुद्धा घरात कुठे ठेवता येईल?

वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा हा घराच्या मुख्य दरवाजासमोर जमिनीपासून किमान ३२ इंचावर ठेवू शकतो. मुख्य दरवाज्यासमोर लाफिंग बुद्ध ठेवण्याचे कारण ज्याक्षणी दरवाजा आपण उघडू त्यावेळी त्या व्यक्तीला लाफिंग बुद्धाचे दर्शन होईल. यामुळे त्या व्यक्तीसोबत आपल्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल. घराच्या मुख्य दरवाजासमोर जागा नसेल तर आपण पूर्व दिशेलाही लाफिंग बुद्धा ठेवू शकतो.

लाफिंग बुद्धा घरात कुठे ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा हे भाग्याचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे लाफिंग बुद्ध कधीही स्वयंपाकघर (Kitchen), जेवणाची जागा, बेडरूम किंवा टॉयलेट-बाथरूमजवळ ठेवू नये. असे केल्याने आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT