What is the right time for Yogini Ekadashi
What is the right time for Yogini Ekadashi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

योगिनी एकादशीची योग्य वेळ कोणती ? त्याचा उपवास करताना कोणत्या चुका टाळाव्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. त्यात शुक्ल पक्षाची एकादशी व कृष्ण पक्षाची एकादशी अशा दोन एकादशी प्रत्येक महिन्याला येत असते.

हे देखील पहा -

आषाढ महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातल्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. ही एकादशी यंदा शुक्रवारी म्हणजे २४ जून या दिवशी येत आहे. यादिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा केली जाते व उपवासही केला जातो. ही एकादशी २३ जून गुरुवारी रात्री ९ वाजून ४१ मिनिटापासून सुरु होत असून २४ जूनला रात्री ११.१२ मिनिटांनी समाप्त होणार आहे. २४ जूनला सर्वार्थ सिध्दि योग व सुकर्मा योग बनत आहे. हे दोन्ही योग शुभ कार्य करण्यासाठी उत्तम आहे.

योगिनी एकादशीचा उपवास करताना या चुका टाळा

१. आपण जर या एकादशीचा उपवास करत असू तर त्या व्यक्तीने कुकर्म व असत्य असणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे. ह्या एकादशीचा उपवास केल्याने आपल्याला वाईट कर्मापासून मुक्ती मिळू शकते.

२. एकादशीचा उपवास केल्याने मोक्ष प्राप्त होतो परंतु, त्यात आपण करणाऱ्या कर्मावर साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. तसेच हे व्रत केल्याने भगवान विष्णूची आपल्यावर कृपा राहाते

३. या एकादशीचे व्रत करण्याऱ्या व्यक्तीने लसूण, कांदा (Onion), मांस, मद्यपान, धुम्रपान इत्यादींचे सेवन करु नये.

४. या दिवशी केस (Hair) धुतल्याने किंवा केसांना तेलांचा वापर केल्याने धनाची हानी होते.

५. तसेच या दिवशी वाईट बोलू नये. कोणाबद्दलही द्वेष किंवा द्वेषाची भावना मनात ठेवू नका. व्रत करताना मन आणि कर्म शुद्ध असणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

Special Report : आमदार म्हणताहेत, "खासदार झाल्यासारखं वाटतंय', राज्यात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

SCROLL FOR NEXT