Laxmi Mata google
धार्मिक

Lakshmi Mata: घरात सुखाची भरभराट आणि लक्ष्मी मातेचा वास हवा? तर करा 'हे' उपाय

Lakshmi Mata: तुम्हाला तुमच्या घराची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर लक्ष्मी मातेची उपासना केली पाहिजे. आता दिवाळीत लक्ष्मी मातेची उपासना करून तुम्ही अडचणींवर मात करू शकतात.

Anjali Potdar

लक्ष्मीप्राप्ती विशेष तोडगे व उपासना -

१. तिन्ही संध्याकाळी लक्ष्मी घरी यायची वेळ असते. तेव्हा कोणाला पैसे देऊ नयेत. खरेदी करू नये. झाडाची पाने तोडू नये. नखे आणि केस कापू नये. वाद-विवाद टाळावा. यावेळी देवी उपासना करावी. स्तोत्र पठण करावे. देवापुढे दिवा लावा. नामस्मरण करून धूपदीप करावा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.

२. मंगळवारी सकाळी स्नान करून दक्षिणाभिमुख मारुतीच्या मंदिरात जावे. श्रीफळ वाढवून देवाला रुईच्या पानांची माळ घालावी आणि या मंत्राचा जप स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा म्हणावा..

कवन सो काज कठीण जग माही |

जो नहीं हुई तात तुम पाही ||

असे सलग ९ मंगळवार करावे लक्ष्मी प्रसन्न होईल.

३. आपल्या उत्पन्नातील किमान २०% रक्कम दानधर्मात खर्च करावी. याने प्रारब्धाची शुद्धी होते लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते आणि केलेल्या कार्यातील यश प्राप्त होते. वेदशास्त्र आणि अठरा पुरणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा अधिक आहे .

४. विपुल धनप्राप्तीसाठी मार्गशीष महिन्यातील गुरुवारी दिवसभर उपास करून संध्याकाळी विष्णू लक्ष्मीचे पंचोपचारे किंवा षोडश उपचार पूजा करून लक्ष्मी सहस्त्रनामाचा पाठ करावा. शक्य असल्यास अपुप (अनारसे) अथवा कंदुक (बेसन लाडू) यांचा नेवैद्य दाखवावा.

५. लक्ष्मी प्राप्ति करता सूर्योदयापूर्वी स्नान करून शुभ्र वस्त्र नेसून दर्भासनावर पूर्वाभिमुख बसावे. सर्वप्रथम नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय वाचवा. नंतर स्फटिकाच्या माळेवर लक्ष्मीदायक शाबरी मंत्राचा एका बैठकीत १०८ वेळा जप करावा. यामुळे घरात असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल. आणि लक्ष्मीची कृपा लाभेल. या साधनेला कोणत्याही गुरुवारी प्रारंभ करून ४० दिवसांनी येणाऱ्या गुरुवारी समाप्ती करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT