Gurupornima 2022 ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

गुरुपौणिमेच्या दिवशी बनतोय खास योग, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्ताबद्दल

हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

कोमल दामुद्रे

मुंबई : हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वर्षात १२ पौर्णिमा येतात व दर महिन्याला एक पौर्णिमा असते. या प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असे रुप व पूजा अर्चना आहे.

हे देखील पहा -

सर्व पौर्णिमेच्या तारखांपैकी, आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही विशेष आहे. गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते (Relation) दृढ करण्यासाठीही ही तिथी विशेष मानली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. चार वेदांचे ज्ञान देणारे महर्षी व्यास यांचा हा जन्मदिवस मानला जातो. दरवर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्मिणा साजरी केली जाते. त्याचे महत्त्व न मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया.

तिथी आणि शुभ मुहूर्त (Time) -

यंदा गुरुपौर्णिमा ही १३ जुलै २०२२ रोजी बुधवारी येत आहे. सकाळी ४ वाजता पौर्णिमेला सुरुवात होत आहे. तर त्याची समाप्ती ही १४ जुलै ला दुपारी १२.०६ मिनिटांनी समाप्त होईल.

खास योग -

यावर्षी पौर्णिमेच्या दिवशी गुरु, मंगळ, बुध आणि शनि हे ग्रह शुभ स्थितीत असून या गुरुपौर्णिमेला रुचक, हंस, षष्ठ आणि भद्रा हे चार योग तयार होत आहेत. या सर्वांसोबतच बुधादित्य योगही या दिवशी तयार होत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ४ ग्रहांचा हा संयोग सर्वांसाठी खास आहे. यामुळे जीवनात अनेक बदल घडतील. या सर्व योगांमुळे यंदाची गुरुपौर्णिमा ही विशेष असल्याचे म्हटले जात आहे.

पूजा कशी करावी ?

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर मंदिराची स्वच्छता केल्यानंतर सर्व देवांना स्नान घालून नवीन वस्त्रे परिधान करावीत. पूजेच्या ठिकाणी देवतेला फुले आणि भोग अर्पण करा आणि आपल्या गुरूची पूजा करा. आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT