Shardiya Navratri 2022 Saam Tv
धार्मिक

Shardiya Navratri 2022 : नवरात्रीत कलशावर नारळ का ठेवला जातो ? तुम्हाला माहित आहे का?

स्थापनेच्या वेळी कलशाच्या वर नारळ नेहमी ठेवला जातो. त्याचे कारण काय जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Shardiya Navratri 2022 : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात श्रीफळाला अधिक महत्त्व आहे. याच्या शिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते.

पूजा करताना कलश स्थापना हा एक मुख्य भाग आहे. याद्वारे देवी-देवतेला पूजेत आवाहान केले जाते. विशेषत: नवरात्रीच्या (Navratri) पूजेदरम्यान कलशाची स्थापना करण्याचा हिंदू धर्मात प्रथा आहे.

नारळ (Coconut) हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पौराणिक मान्यतांनुसार, जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत ३ वस्तू आणल्या होत्या ज्यात पहिली देवी लक्ष्मी, दुसरी कामधेनू गाय आणि तिसरी नारळाचे झाड होते. नारळ हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे आवडते फळ मानले जाते. म्हणूनच प्रत्येक पूजेत त्याचे स्थान निश्चित करण्यात आले आहे.

असे मानले जाते की, नारळ हे एकमेव फळ आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवाचा वास असतो. यामुळेच कोणत्याही शुभ कार्यात नारळ नक्कीच ठेवला जातो. हे फळ भगवान शंकराचे आवडते फळ देखील मानले जाते आणि त्यात दिसणारे तीन ठिपके शिवाचे तीन डोळे दर्शवतात.

नारळ हा गुरु बृहस्पतीचा करक मानला जातो आणि त्याचा पूजेत आणि कलश स्थापनेत समावेश केल्याने गुरु बृहस्पतीची पूर्ण कृपा आपल्यावर राहते. गुरु हा समृद्धीचा ग्रह मानला जातो आणि त्याला प्रसन्न केल्याने घरात समृद्धी राहते. घटस्थापनेच्या वेळी कलशात नारळ ठेवल्यास गुरूची कृपा जीवनात राहते आणि आनंद मिळतो.

घरातील फुलदाणीत नारळ ठेवल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि जीवनात यश मिळते. नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना केल्यास घरातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात.

नवरात्रीत कलशावर नारळ ठेवताना काही नियमांचे पालन केले पाहिजे.

- नवरात्रीच्या काळात जेव्हा तुम्ही कलशावर नारळ ठेवता तेव्हा ते पूजा करणाऱ्या व्यक्तीकडे तोंड करावे.

- कलश बसवताना नारळ, आंबा किंवा अशोकाची पाने ठेवा.

- कलशात पाणी घाला आणि एक नाणे टाका आणि त्यावर एक नारळ ठेवा.

- अशा प्रकारे नारळाची प्रतिष्ठापना केल्याने सर्व देवतांची पूजा मान्य होते आणि घरात सुख-समृद्धी राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT