Navaratri 2022  Saam TV
धार्मिक

Navaratri 2022 : नवरात्रीच्या काळात 'या' प्रसिध्द मंदिरांना भेट द्या, त्यापैकी 'हे' मंदिर उत्तराखंडात आहे नावाजलेले !

या मंदिरांना भेट देऊन आईचा आशीर्वाद घेऊ शकता. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल.

कोमल दामुद्रे

Navaratri 2022 : यावर्षी नवरात्री २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत आहे आणि दसरा ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. अशा परिस्थितीत, नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये, आपल्या कुटुंबासह देवी दुर्गेच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकतो. जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. या मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद घेऊ शकता. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल.

वैष्णो देवी मंदिर

vaishno devi

या नवरात्रीला तुम्ही तुमच्या कुटुंबासह माँ वैष्णो देवी मंदिराला भेट देऊ शकता. वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. हे मंदिर त्रिकुटा टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून १५ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे. जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे असलेले वैष्णोदेवी मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वी ब्राह्मण पुजारी पंडित श्रीधर यांनी बांधले होते. हे मंदिर कटरा पासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

माता वैष्णोदेवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता RFID ची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे भाविक माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या नजरेत सदैव असतील. त्यामुळे कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रवाशांना शोधणे कठीण होणार नाही. यापूर्वी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना स्लिप देण्यात आल्या होत्या. पण आता रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) कार्डची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनसा देवी आणि नैना देवी

Mansa and Naina Devi

या नवरात्रीला मनसा देवी आणि नैना देवी मंदिराला भेट देऊ शकता. ही दोन्ही प्रसिद्ध मंदिरे उत्तराखंडमध्ये आहेत. देशाच्या (World) कानाकोपऱ्यातून भाविक मनसादेवी मंदिरात दर्शनासाठी येतात आणि येथे प्रार्थना करतात. नवरात्रीच्या काळात येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे मंदिर हरिद्वारमध्ये आहे. नैना देवी मंदिर नैनिताल येथे आहे आणि हे प्रसिद्ध मंदिर (Temple) देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांना आकर्षित करते. हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. या नवरात्रीला नैना देवीचे दर्शन घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT