धार्मिक

Fourth Day of Navratri : नवदुर्गेचे चौथे रुप कुष्मांडा, जाणून घ्या तिची आख्यायिका

नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो.

दुर्गा देवीच्या नऊ रुपांमुळे तिला नवदुर्गा असे म्हटले जाते. नवरात्रातील चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे. या वेळी चतुर्थी तिथीचा शारदीय नवरात्रीमध्ये क्षय होत आहे. म्हणूनच चतुर्थी तिथीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीचे व्रताचरण, पूजन, महत्त्व, मंत्र आणि मान्यता जाणून घेऊया

शास्त्रानुसार शारदीय नवरात्रीच्या चतुर्थी तिथीला देवी अष्टभुजा या रूपात आपल्या मंद हास्याने शरीरातून विश्वाची निर्मिती केली. कुष्मांडा देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे. या स्वरूपाची पूजा केल्याने केवळ रोग आणि दुःख दूर होत नाही तर कीर्ती, सामर्थ्य आणि संपत्तीही वाढते.

काशीतील देवीच्या दर्शनाची कथा राजा सुबाहूशी संबंधित आहे. दुर्गाकुंड परिसरात कुष्मांडा देवीचे मंदिर असून तिला दुर्गाकुंड वाली दुर्गा असेही म्हणतात.

कुष्मांडा देवीचे पूजन -

सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरुपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती, आपापल्या पद्धती, परंपरांनुसार देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन अर्पण करा. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम, असे सांगितले जाते.

कथा -

पौराणिक कथेनुसार देवी कुष्मांडाच्या शरीराचे तेज सूर्यासारखे आहे. असे मानले जाते की जो कोणी देवी कुष्मांडाची खऱ्या मनाने पूजा करतो, तिच्यावर माता प्रसन्न होते आणि सर्व रोग आणि दुःखांचा नाश करते. त्याचबरोबर त्यांच्या भक्तीमुळे माणसाचे सामर्थ्य, वय, कीर्ती आणि आरोग्य वाढते.

कृष्मांडा देवीचा मंत्र -

ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

या देवी सर्वभू‍तेषु माँ कृष्माण्डा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT