Horoscope, Gunmilan tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

कुंडलीतील गुणमेलनातील षडाष्टकाचा अर्थ कसा समजेल

कुंडली जुळवताना रास, नक्षत्र व इतर गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कुंडली जुळवताना रास, नक्षत्र व इतर गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. वधु आणि वराचे गुण मिलन करताना बऱ्याचदा आपल्या षडाष्टक, मृत्यूषडाष्टक किंवा प्रीतीषडाष्टक आहे असे सांगितले जाते.

हे देखील पहा -

बऱ्याचदा प्रेमी जोडप्यांच्या गुण मिलनात षडाष्टक, मृत्यूषडाष्टक किंवा प्रीतीषडाष्टक या तिन्ही योगापैकी कुठलाही योग घडून आल्यास त्यांना विवाह करण्यास मनाई केली जाते. शक्यतो मृत्यूषडाष्टक असल्यास याचे प्रमाण अधिक असते परंतु, या तिन्ही योगांबद्दल आपल्याला अधिक माहिती नसल्यामुळे आपण गोंधळतो. ह्याचे महत्त्व (Benefits) नेमके काय आहे हे जाणून घेऊया.

१. मृत्यूषडाष्टक हा मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनू व कुंभ या सर्व पुरुष राशींच्या षष्ठस्थानी येणाऱ्या राशींशी अनुक्रमे कन्या, वृश्चिक, मकर, मीन, वृषभ, व कर्क विरुध्द असणाऱ्या राशीसोबत विवाह जुळवण्याचा प्रयत्न केल्यास मृत्यूषडाष्टक होतो. मेष, सिंह, धनू या अग्नी राशी असून त्यांच्यापासून षष्ठ स्थानात कन्या, मकर, वृषभ या पृथ्वीराशी येतात. मिथुन, तूळ, कुंभ या वायुराशी असून षष्ठात वृश्चिक, मीन आणि कर्क या जलराशी येतात.

२. राशीस्वामींचा विचार केल्यास मंगळ व बुध, गुरू, शुक्र आणि रवी व शनी यांच्या विरोधी तत्त्वराशीत षडाष्टक होत जाते. मंगळ एक घाव दोन तुकडे, तर बुध दोघांना एकत्र आणणारा ग्रह असल्याने या दोघांचे पटत नाही. गुरू देवांचा गुरू तर शुक्र दानवांचा गुरू अर्थातच या मृत्युषडाष्टकमध्ये तर्कही आहे.

३. प्रीतिषडाष्टकामध्ये वरच्याप्रमाणेच सहा-आठ असे नाते असते तरी दोन्ही राशींचे स्वामी मित्र असल्यामुळे दोन्ही राशींचे स्वभाव जुळू शकतात. उदाहरणार्थ मेष-वृश्चिक, मिथुन-मकर, सिंह-मीन, तूळ-वृषभ, धनू-कर्क, कुंभ-कन्या या प्रीतिषडाष्टाकातील जोड्या आहेत. मंगळ, रवी, गुरू, चंद्र हे एकमेकांचे मित्र ग्रह असून बुध, शुक्र, शनी या ग्रहांचा वेगळा गट निर्माण होतो.

४. लग्न (Marriage) जुळवताना या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात. वधु व वराची रास, त्याचे नक्षत्र, स्वामी व जुळणारे ग्रह कोणते ह्या सर्वांचा विचार करुन गुणमेलन केले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT