Budh Gochar 2024 Google
धार्मिक

Budh Gochar 2024: मे महिन्यात बुध ग्रहाचं परत एकदा परिवर्तन; ५ राशींच्या जीवनात होणार मोठी घडामोड

Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध ग्रह राशीत परिवर्तन केल्यानंतर काही राशींसाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. बुध ग्रहाच्या परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधला नऊ ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी बुधाचे संक्रमण महत्त्वाचं आहे. मे महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह दोनदा आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषांच्या मते बुध ग्रहाने काही दिवसांपूर्वी म्हणजेच १० मे रोजी मेष राशीत प्रवेश केलाय. आता बुध मेष राशीत प्रवेश करणार असून याचा ३ राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडणार आहे.

मेष राशी

बुध वृषभ राशीत प्रवेश करताच मेष राशीच्या लोकांची सुटका आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल. विवाहित लोकांच्या जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळू शकते. आयुष्यभर तुमचा जोडीदार तुमच्या कामात मदत करेल. अनेकांच्या कार्यक्षेत्रात विस्तार होईल.

मिथुन राशी

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठीही हे परिवर्तन चांगले असणार आहे. या राशीतील काही लोकांचे नशीब अचानक बदलू शकते. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी जागा बदलण्याची शक्यता आहे. उत्पन्नातही वाढ होऊ शकते. तुमच्या जीवनातील सर्व समस्या संपतील.

कर्क राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं राशीतील बदल वरदानापेक्षा कमी नाही. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करणाऱ्यांना लवकरच संधी मिळेल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

तूळ

या राशीतील लोकांसाठी बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश अनुकूल ठरू शकतो. या राशीतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. ऑफिसच्या कामासाठी तुम्हाला लांबचा प्रवासही करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तिथे तुम्हाला एखादा मोठा उद्योगपती भेटू शकतो. तुमचा प्रवास शुभ राहील.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं राशीतील बदल शुभ सिद्ध होऊ शकतं. जीवनात सकारात्मकता येईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी नात्याची चर्चा होऊ शकते. तसेच ज्या तरुण आणि तरुणीच्या लग्नाची चर्चा चालू आहे, त्यांना नवीन स्थळे येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT